Woman Health : तुमचे वय जर 50 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही इथे लक्ष द्या, कारण तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महिला वयाच्या पन्नाशीत पोहोचल्यानंतर त्यांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. या वयात महिलांना रजोनिवृत्तीसह अनेक शारीरिक बदलांना सामोरे जावे लागते आणि वयाच्या 50 व्या वर्षी महिलांच्या शरीरातील चरबीही वाढते. या काळात महिलांच्या त्वचेची लवचिकता कमी होऊ लागते आणि त्यांना सुरकुत्या पडणे, केस पांढरे होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांच्या शरीरातील स्नायूही कमी होऊ लागतात त्यामुळे महिलांना अशक्तपणा जाणवू लागतो. अशात आता प्रश्न येतो. 50 व्या वर्षी फिट राहायचंय? पण ते शक्य आहे का? याचे उत्तर हो हे शक्य आहे. कारण अशी एक गोष्ट आहे, जी तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात बदल घडून आलेले तुम्हाला जाणवतील.
आहार आणि पोषणाची काळजी घ्यायलाच हवी!
50 व्या वर्षी महिलांच्या शरीराला पोषक तत्वांची गरज असते. या वयात महिलांनी आपल्या आहार आणि पोषणाची काळजी घेतली तर भविष्यात त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. याशिवाय, तुम्ही एक सक्रिय जीवन जगू शकता. वयाच्या 50 व्या वर्षी महिलांनी त्यांच्या आहारात काही पोषक घटकांचा दररोज पुरेशा प्रमाणात समावेश करणे महत्त्वाचे आहे. अशात, या सर्व समस्या टाळण्यासाठी, महिलांनी या काळात पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे, त्यापैकी एक दलिया आहे. दलियाला तुटलेला गहू असेही म्हणतात आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 50 वर्षांच्या महिलांनी त्यांच्या आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया दलियाचे फायदे -
वजन नियंत्रणात मदत
वयाच्या 50 व्या वर्षी महिलांना त्यांच्या शरीरात महत्त्वाचे बदल जाणवतात, ज्यात वजन वाढणे समाविष्ट असते, त्यामुळे आरोग्यदायी आणि अनावश्यक वजन वाढण्यास कारणीभूत नसलेल्या अशा गोष्टींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. दलियामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते आणि ते खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. एका रिसर्चनुसार, ज्या महिला रोज अख्खे धान्य सेवन करतात त्यांचे वजन कायम राखते.
बद्धकोष्ठता दूर करते
एका संशोधनात असे आढळून आले आहे की, रजोनिवृत्तीनंतर महिलांना इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनसारख्या संप्रेरकांची पातळी कमी झाल्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांचे पेल्विक फ्लोअरचे स्नायूही खूप कमकुवत होऊ लागतात. फायबरमध्ये समृद्ध असण्याव्यतिरिक्त, दलिया आतड्यांमधून आणि पाचन तंत्रातील विषारी पदार्थ आणि कचरा काढून टाकण्याचे काम करते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो. उच्च फायबर सामग्रीमुळे, पोटदुखी, मळमळ, गॅस तयार होणे आणि सूज येणे यासारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगांची लक्षणे कमी करण्यासाठी दलिया फायदेशीर आहे.
स्नायूंचे आरोग्य
वाढत्या वयानुसार, स्नायूंच्या वस्तुमानात 3 ते 8 टक्के घट होते आणि वयाच्या 50 नंतर, हा दर आणखी वाढू लागतो. दलियामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात ज्यामुळे स्नायूंचे प्रमाण वाढते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :