Maharashtra Hidden Places: थंडगार वातावरण, धुक्याची चादर, निसर्गरम्य देखावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी गर्दी असलेलं ठिकाण असेल तर तुमची विंटर पिकनिक यशस्वी झालीच म्हणून समजा..! दरवेळेस लोक जेव्हा फिरण्याचा प्लॅन करतात, तेव्हा लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, माथेरान अशी ठिकाणं निवडतात. पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील एक ठिकाण पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. असं कोणतं आहे ते ठिकाण? जाणून घ्या..
महाराष्ट्रात दर महिन्याला हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात
महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख आणि सुंदर राज्य आहे. इथे अशी अनेक भव्य आणि सुंदर ठिकाणे आहेत, जिथे दर महिन्याला हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. उदाहरणार्थ, मुंबई, लोणावळा, खंडाळा, माथेरान आणि महाबळेश्वर सारख्या ठिकाणी बरेच पर्यटक भेट देतात. महाराष्ट्रात अशी अनेक अद्भुत आणि सुंदर ठिकाणे आहेत, ज्यांची माहिती फार कमी लोकांना असेल. महाराष्ट्रातील चिखलदरा हे देखील एक असे ठिकाण आहे, ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहितीही नसेल. आज आम्ही तुम्हाला चिखलदऱ्याची खासियत आणि येथे असलेल्या काही अद्भुत ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना भेट दिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध ठिकाणे विसराल.
चिखलदरा - निसर्गप्रेमींचे नंदनवन!
चिखलदऱ्याची खासियत जाणून घेण्याआधी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, चिखलदरा हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे. हे मुख्य शहर अमरावतीपासून सुमारे 82 किमी अंतरावर आहे. चिखलदऱ्याला निसर्गप्रेमींचे नंदनवन या नावानेही ओळखतात. चिखलदरा महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून सुमारे 691 किमी अंतरावर, नागपूरपासून सुमारे 221 किमी आणि अकोला शहरापासून सुमारे 128 किमी अंतरावर आहे.
चिखलदऱ्याची खासियत - महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन
चिखलदरा हा डोंगराळ परिसर आहे, जो त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. चिखलदरा हे महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन देखील मानले जाते. हा महाराष्ट्राचा छुपा खजिनाही मानला जातो. चिखलदरा हे निसर्गसौंदर्यासाठी तसेच शांत वातावरणासाठी ओळखले जाते. अनेक पर्यटक येथे निवांत क्षण घालवण्यासाठी येत असतात. चिखलदरा हे उंच पर्वत, हिरवेगार कुरण आणि तलाव आणि धबधब्यांसाठी देखील ओळखले जाते. चिखलदराविषयी असे म्हटले जाते की महाभारतातही त्याचा उल्लेख आहे.
हिवाळा-पावसाळ्यात चिखलदऱ्याचे अप्रतिम सौंदर्य
चिखलदरा पर्यटकांसाठी अतिशय खास मानला जातो. विशेषत: निसर्गावर प्रेम करणाऱ्यांसाठी चिखलदरा हे नंदनवन मानले जाते. चिखलदऱ्यातील चित्तथरारक दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात. चिखलदरा हे साहसप्रेमींचे नंदनवनही मानले जाते. अनेक पर्यटक येथे फक्त ट्रेकिंग, हायकिंग आणि कॅम्पिंगसाठी येतात. हिवाळा-पावसाळ्यात चिखलदऱ्याचे सौंदर्य अगदी पाहण्यासारखे असते, कारण संपूर्ण चिखलदरा ढगांनी व्यापलेला असतो. त्यामुळे पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे पोहोचतात.
फोटोप्रेमींसाठी उत्तम ठिकाण
चिखलदरा येथे अनेक अद्भुत आणि सुंदर ठिकाणं आहेत, जी तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तुम्ही पंचबोल पॉइंट, गुगामल नॅशनल पार्क आणि भीम कुंड यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. चिखलदऱ्याच्या चित्तथरारक दृश्यांमध्ये तुम्ही संस्मरणीय छायाचित्रण देखील करू शकता. याशिवाय गुगामल नॅशनल पार्कमध्ये तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता.
चिखलदरा जवळ भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणं
चिखलदऱ्याच्या आसपास अनेक अद्भुत ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही मेळघाट व्याघ्र प्रकल्प, घटांग, कटकुंभ, अंबापती आणि शहानूर सारखी अद्भुत ठिकाणे देखील पाहू शकता.
हेही वाचा>>>
Maharashtra Hidden Places: 'अरेच्चा..! महाराष्ट्रात लपलेले 'हे' सुंदर हिल स्टेशन माहितच नव्हते!' अनेकांच्या नजरेपासून दूर, एकदा बघाल तर प्रेमातच पडाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )