Winter Travel: हिवाळा असा ऋतू आहे, जो सर्वांनाच आवडतो. हिवाळ्याच्या ऋतूत, प्रत्येकाला असे वाटते की अशा ठिकाणी जावं, जिथे आपलं सगळं टेन्शन बाजूला ठेवून काही क्षण का होईना निसर्गाशी एकरुप व्हावं. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला क्षणभर विसावा म्हणजेच कामाच्या गडबडीतून ब्रेक घेऊन निसर्गाशी एकरुप होणे गरजेचे आहे. कारण यामुळे व्यक्तीचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य अगदी उत्तम राहते. आज आपण भारतातील खास हिवाळ्यात फिरता येतील, अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत. जे फॉरेनच्या देशांपेक्षा कमी नाही. या ठिकाणांना मिनी स्वित्झर्लंड देखील म्हटले जाते. जाणून घेऊया.. 


भारतातील मिनी स्वित्झर्लंड..!


स्वित्झर्लंड हे एक असे ठिकाण आहे. जिथे प्रत्येकाला जावेसे वाटते. खास करून सामान्य भारतीय नागरिकासाठी या ठिकाणी पोहचणे थोडे कठीण असू शकते. कारण एका देशातून दुसऱ्या देशात जाणे म्हणजे भरपूर खर्च करावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला भारतातीलच अशा काही ठिकाणांबद्दल सांगत आहोत. ज्यांना भारतातील मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. जिथे बर्फवृष्टी होते, जिथे थंड वारे आणि शांत दऱ्या आपल्याला स्वतःकडे आकर्षित करतील, भारतात अशी काही ठिकाणं आहेत. जिथे भेट देणे खूप खास ठरेल. तुम्हाला माहिती आहे का? हिवाळ्याच्या ऋतूत भारतातील काही ठिकाणांना मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. बर्फाच्छादित पर्वत, हिरव्यागार दऱ्या आणि विलोभनीय दृश्ये मन मोहून टाकतात. आज आम्ही तुम्हाला स्वित्झर्लंडसारख्या काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊ शकता...


हे भारतातील मिनी स्वित्झर्लंड...


खज्जियार-  नैसर्गिक सौंदर्य, सुरूची झाडं, बर्फ..


हिमाचल प्रदेशातील खज्जियारला तेथील नैसर्गिक सौंदर्य, सुंदर सुरूची वृक्ष आणि बर्फाच्छादित खडकांमुळे भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. जर तुम्ही या ठिकाणाजवळ राहत असाल तर खज्जियार तलावाच्या काठावर वेळ घालवण्याचा आनंद घ्या. याशिवाय तुम्ही पॅराग्लायडिंग, झोरबिंग आणि ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता.


औली - भारताचे स्कीइंग डेस्टिनेशन


उत्तराखंडमधील औलीला भारताचे स्कीइंग डेस्टिनेशन म्हटले जाते. इथले बर्फाच्छादित पर्वत आणि निळे आकाश तुम्हाला स्वित्झर्लंडसारखे वाटते. येथे तुम्ही स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगचा आनंद घेऊ शकता. औलीचे जोशीमठ आणि गोरसन बुग्याल ट्रेक खूप प्रसिद्ध आहेत. याशिवाय तुम्ही येथे केबल कार राइडचाही अनुभव घेऊ शकता.


गुलमर्ग - भारताचे स्वित्झर्लंड


सुंदर बर्फाच्छादित तलाव, गोंडोला राइड्स आणि जागतिक दर्जाच्या स्कीइंग सुविधांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्गला भारताचे स्वित्झर्लंड म्हटले जाते. येथे तुम्ही गुलमर्ग गोंडोला राइडचा आनंद घेऊ शकता.