Winter Looks : हिवाळ्यात कुठे फिरायला जायचं म्हटलं की, सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे कपडे निवडणं. थंडीत रोजच्या कॉलेज किंवा ऑफिस रुटीनसाठी आपण रोजच्या कपड्यांवर कोणतंही जॅकेट चढवून निघतो. पण हेच बाहेर फिरायला जाताना स्टायलिश दिसण्यासाठी नेमकं काय घालावं? यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीकडून काही टिप्स घेऊ शकता. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानची स्टायलिश विंटर आऊटफिट तुम्ही ट्राय करू शकता.
अभिनेत्री हिना खानचा (Hina Khan) ड्रेसिंग सेन्स खूपच चांगला आहे. हिना खानचं हिवाळ्यातील कपड्यांचं कलेक्शनही चांगलं आहे. ती दररोज तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याचे फोटो शेअर करत असते, ज्यातून तुम्हाला हिवाळ्यातील पोशाखांसाठी टिप्स मिळू शकतात.
फुल स्लीव्ह टर्टल नेक टी-शर्ट आणि हाफ जॅकेट
हिना खानचा हा लूक, ज्यामध्ये तिने गडद राखाडी जीन्ससह केशरी रंगाचा टर्टल नेक टी-शर्ट घातला आहे आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे हाफ जॅकेट घातले आहे. यासोबत हिवाळ्यातील कॅप देखील आहे.
फुल स्लीव्ह जॅकेट
यामध्ये हिना खानने फिकट जांभळ्या कलरच्या ट्राउझर्ससह फिकट हिरव्या आणि गडद निळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेलं जॅकेट घातलं आहे.
काळा रंग
ज्यांना काळ्या रंगाचे कपडे घालण्याची खूप आवड आहे, त्यांच्यासाठी हिनाचा हा लूक एकदम परफेक्ट आहे. तसेच, तिने त्याच रंगाची लांब पँट आणि शूज देखील कॅरी केले आहेत.
जरा हटके
पांढऱ्या रंगाच्या या सूटमध्ये हिना अतिशय सुंदर दिसत आहे. ऑफिस आणि कॉलेज पार्ट्यांमध्येही तुम्ही ही स्टाइल ट्राय करू शकता.
शॉट स्कर्ट
यामध्ये हिनाने फिकट निळ्या रंगाचा शॉट स्कर्ट कॅरी केला आहे. पांढरा शर्ट आणि हाफ हिरवा स्वेटर यामुळे ती एकदम स्टायलिश दिसत आहे.
हेही वाचा:
Winter Foods : थंडीत आवडीने खाल्ले जातात 'हे' स्ट्रीट फूड; यातील तुमचा आवडता पदार्थ कोणता?