Winter Health Tips : सध्या अनेक ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली जात आहे आणि कडाक्याच्या थंडीपासून (Winter Season) स्वतःचा बचाव करण्यासाठी लोक जाड कपडे घालण्यापासून शेकोटी पेटवण्यापासून ते रूम हीटर आणि ब्लोअर वापरण्यापर्यंत सर्व गोष्टींचा वापर करतायत. पण, तुम्हाला माहिती आहे का हे तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकते. त्याचबरोबर रुम हीटर आणि ब्लोअरमुळे त्वचेबरोबरच डोळ्यांनाही नुकसान पोहोचते. त्यामुळे ब्लोअर वापरताना काही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत तुमच्या डोळ्यांत काही समस्या येत असतील तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यामागचे कारण ब्लोअर आणि हीटरच्या संपर्कात दीर्घकाळ राहणं असू शकते. त्यामुळे डोळ्यांना खाज सुटण्याची आणि लालसरपणाची समस्या निर्माण होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात सुरक्षेसाठी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे.
बंद खोलीत ब्लोअर, हीटर वापरू नका
हीटर आणि शेकोटीसमोर जास्त वेळ बसणे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच घातक ठरू शकते. हे टाळण्यासाठी, बराच वेळ त्याच्या संपर्कात न राहण्याचा प्रयत्न करा आणि विशेषत: हीटर इत्यादी चालवल्यानंतर खोली पूर्णपणे बंद करू नका.
ही लक्षणे डोळ्यांत दिसल्यास काळजी घ्या
डोळ्यांभोवती दुखणे, डोळ्यांना खाज सुटणे, जळजळ होणे, डोळे लाल होणे, पाणी येणे अशी लक्षणे दिसत असल्यास आग किंवा हीटरजवळ बसू नये. याबरोबरच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. आगीजवळ बसणे अधिक महत्त्वाचे असल्यास, आपला चेहरा थेट फायरप्लेस किंवा हीटरसमोर नसेल यासाठी प्रयत्न करा.
मुलांची विशेष काळजी घ्या
जर तुमच्या घरात लहान मूल असेल आणि खोली उबदार ठेवण्यासाठी हीटर वापरत असाल तर अधिक काळजी घ्या. कारण थोड्याच वेळात खोलीचे तापमान खूप गरम होऊ शकते आणि यामुळे मुलाला गुदमरू शकते, त्यांचा जीव घाबराघुबरा होऊ शकतो. मुलांची त्वचा खूप नाजूक असते आणि जर ते जास्त काळ उष्णतेच्या संपर्कात राहिल्यास त्यांना लालसरपणा, चिडचिड, पुरळ येणे आणि कोरडेपणा जाणवणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.