Winter Health Tips : आपल्या शरीरासाठी पाणी आवश्यक आहे हे आपणा सर्वांना माहित आहे. पण अनेक गोष्टींबरोबर पाणी प्यायल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येते. यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाण्याचे सेवन केले पाहिजे. डॉक्टरही आपल्याला पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पीत असाल तर ते शरीरासाठीही हानिकारक ठरू शकते. जसे अनेकांना जेवणाआधी किंवा नंतर भरपूर पाणी पिण्याची सवय असते. असे केल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या ठिकाणी आम्ही तुम्हाला पाणी पिण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
तुम्हालाही जेवताना पाणी पिण्याची सवय असेल तर, 'या' गोष्टी जाणून घ्या
दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण, जेवण करताना पाणी प्यायल्यास त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. अन्न खाताना आपली पचन प्रक्रिया सुरू होते, अशा परिस्थितीत जर तुम्ही मध्येच पाणी प्यायलात तर पचन प्रक्रियेत अडथळा येतो. यामुळे तुम्ही खाल्लेले अन्नही शरीराला नीट पचत नाही किंवा ते पचायला खूप वेळ लागतो. म्हणूनच जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा नंतर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने अन्नाचे पचन चांगले होते आणि पचनाची प्रक्रियाही बरोबर राहते.
चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याचे तोटे नक्की जाणून घ्या
पाणी न पिण्याच्या नुकसानाबद्दल तुम्ही खूप कमी ऐकले असेल. परंतु चुकीच्या पद्धतीने तुम्ही पाण्याचे सेवन केल्यास शरीरावर वाईट परिणाम होतो. त्याचप्रमाणे, जर तुम्ही अन्नाबरोबर पाणी पीत असाल तर तुम्हाला अॅसिड रिफ्लक्सची समस्या देखील होऊ शकते. त्याची समस्या अशा प्रकारे असू शकते की पोटात ऍसिड तयार झाल्यामुळे आंबट ढेकर येतात. याशिवाय तुम्ही जेवताना पाणी प्यायलात तर तुमचे पोट लवकर भरते, त्यामुळे तुमची भूक मरते. तसेच या सवयीमुळे तुम्ही लठ्ठपणाचाही बळी होऊ शकता. म्हणूनच ही सवय आजपासूनच बंद करा, जेणेकरून तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :