Lalit Prabhakar Tarri : अभिनेता ललित प्रभाकरचा (Lalit Prabhakar) 'टर्री' (Tarri) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री... त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोय...टर्री", असा जबरदस्त स्वॅग या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगड्या अंदाजात 'टर्री' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ललित प्रभाकर प्रथमच अशा ‘टेरर स्वॅग’ मध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. ललितने या सिनेमाचे पोस्टर आऊट केल्यापासून चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
बेधडक 'टर्री' 17 फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'टर्री' हा सिनेमा 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टर्री' या सिनेमात ललित सोबत गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर आदि कलाकारांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश काळे यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.
भूमिकेविषयी ललित म्हणाला,"टर्री' या सिनेमाच्या निमित्ताने आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी भूमिका करायला मिळाली आहे. वर्षभर या भूमिकेसाठी मी मेहनत घेतली असून सिनेमातील माझा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास आहे.
ललित प्रभाकरने शेअर केलेल्या व्हिडीओवर काहीतरी नवीन मार्केटमध्ये येत आहे, विषय संपला, मराठीतला पुष्पा, आता सिनेमाची प्रतीक्षा अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच या नव्या भूमिकेला चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संबंधित बातम्या