नवी दिल्ली : कोण जास्त झोपतो, यावरुन अनेकदा पती-पत्नीमध्ये किंवा घरातल्या अनेकांमध्ये वाद होत असतात. जर कुणी पुरुष म्हणत असेल की, महिलाच जास्त झोपतात, तर त्यात चूक नाही. कारण एका अभ्यासात असं समोर आलंय की, पुरुषांपेक्षा महिलांची झोप जास्त असते.


महिलांच्या मेंदूत अधिक गुंतागुंत असते. एवढंच नव्हे तर महिलांचं मेंदू पुरुषांपेक्षा अधिक परिश्रम करतं. त्यामुळेच महिलांना मल्टिटास्किंग म्हटलं जातं, असं अभ्यासात म्हटलं आहे.

त्याचसोबत, महिला पुरुषांपेक्षा पाचपट जास्त माहितीची देवाण-घेवाण करतात. त्यामुळे मेंदूला आरामाची नितांत गरज भासते. त्यामुळे महिलांना अधिक झोपेची गरज असते, असे या अभ्यासात म्हटले आहे.

सूचना : हे वृत्त रिसर्चवर आधारित असून, एबीपी माझा या अभ्यासातील दाव्याला दुजोरा देत नाही.