Parenting Tips : आजकाल कुटुंब(Family) संबंध कमकुवत होऊ लागले आहेत. मुलांना आजी-आजोबांसोबत वेळ घालवता येत नाही आणि त्यांचा जो विकास व्हायला हवा तो होत नाही. म्हणूनच मुलांनी आजी-आजोबांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. तसेच नोकरी करणारे पालक, व्यस्त जीवन आणि बदलती जीवनशैली यामुळे मुलांचा आजी-आजोबांशी संबंध तसा येत नाही. मुलांना आजी-आजोबांसोबत जास्त वेळ घालवता येत नाही. अभ्यास, खेळ, अ‍ॅक्टिव्हिटी आणि मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे मुलांना आजी-आजोबांसोबत जास्त वेळ राहता येत नाही. आजी-आजोबा मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतात. मुले त्यांच्यासोबत राहून खूप काही शिकू शकतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व खूप चांगले बनते . आजी-आजोबांची शिकवण त्यांचा आयुष्यत प्रगती करण्यासाठी  खूप उपयुक्त ठरते . चला तर जाणून घेऊया मुलांनी आजी आजोबांसोबत वेळ का घालवावा. 



मुले संस्कृती शिकतात 


जेव्हा मुलं आजी-आजोबांसोबत जास्त वेळ घालवतात तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबाला समजून घेण्याची संधी मिळते. प्रथा आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते. आजी-आजोबांचा अनुभव मुलांसाठी उपयुक्त आहे. त्यांच्यासोबत मुले सण साजरे करू शकतात आणि त्यांच्या नातेवाईकांबद्दल जाणून घेऊ शकतात.


मुले सुसंस्कृत होतात 


आजी-आजोबांसोबत राहून मुलं चांगल्या गोष्टी शिकतात. मोठ्यांचा आदर करणे, लहानांवर प्रेम करणे, नियमितपणे देवाची प्रार्थना करणे आणि परंपरा समजून घेण. यामुळे त्यांना चांगला माणूस बनण्यास मदत होते.


आजोबांच्या कथा 


आजकाल फार कमी मुलं त्यांच्या आजी-आजोबांच्या कथा ऐकू शकतात. आजी-आजोबा सांगतात त्या कथा, त्यांनी सांगितलेल्या कवितांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. त्यांना नैतिक मूल्ये समजतात आणि भविष्य सुंदर होते.


मुलं व्यक्त होऊन बोलतात 


मुलं काही गोष्टी पालकांना सांगायला लाजतात. पण ते मोकळेपणाने त्यांच्या आजी-आजोबांना सांगतात. यामुळे ते कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडतात. यामुळे मुले तणावग्रस्त होत नाहीत आणि नेहमी आनंदी राहतात.


एकटेपणा वाटत नाही 


आजी-आजोबांसोबत वेळ घालवून मुले आपले विचार मांडतात. यामुळे त्यांना एक मित्र मिळतो आणि त्यांना एकटे वाटत नाही. यामुळे मुले भरकटत नाहीत आणि भावनिकदृष्ट्याही खंबीर होतात . त्याची विचारसरणी सकारात्मक होते. जेव्हा पालक व्यस्त असल्यामुळे मुलांना वेळ देऊ शकत नाहीत, तेव्हा आजी-आजोबा ती पोकळी भरून काढतात.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Health Tips : पावसाळ्यात आजारी पडायचे नसेल तर स्वतःला लावा या सवयी