... म्हणून लसूण खाल्ल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येते
लसूण खाल्ल्यानंतर लगेचच तोंड धुऊन काढावं, किंवा ब्रश करावा. यामुळे तोंडातून जास्त वेळ दुर्गंधी येणार नाही. माऊथ फ्रेशनर हा देखील एक चांगला उपाय ठरु शकतो.
या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी लसूण न खाणे हा एकमेव उपाय सुचतो. मात्र लसूण खायचाच असेल तर दुर्गंधीपासून वाचण्यासाठीही तुम्ही काही उपाय करु शकता.
लसूण खाल्ल्यानंतर केवळ तोंडातूनच नव्हे, तर संपूर्ण शरिरातून याचा दुर्गंध येत असल्याचं जाणवतं. कारण सल्फर हे एक ब्लडस्ट्रीम कंपाऊंड आहे, जे फुफ्फुस आणि त्वचेपर्यंत पोहचतं.
लसणातील सल्फर हे दुर्गंधीमागचं सर्वात मोठं कारण आहे. सल्फर हा एक रासायनिक घटक आहे, ज्याचा दुर्गंध सडलेल्या अंड्यासारखा येतो. लसूण खाल्ल्यानंतर तोंडातील बॅक्टेरिया आणि सल्फर यांचं कॉम्बिनेशन होतं, त्यामुळे हा दुर्गंध येतो.
लसूण खाल्ल्यानंतर तोंडाचा वास येतो, ही एक सामान्य तक्रार आहे. त्यामुळेच अनेक जण लसूण खाणंही टाळतात. मात्र तोंडातून येणाऱ्या या दुर्गंधीपासून वाचण्याचेही काही मार्ग आहेत.