Beach Holidays : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडतात. काहींना थंड हवेच्या ठिकाणी जायला आवडते तर काही जण समुद्राच्या ठिकाणी (Holiday On Beach) जातात.  फिरण्याची आवड सगळ्यांनाच असते, पण फिरायला जाताना सोबत काय ठेवावे हे अनेक जणांना लक्षात येत नाही. पण बाहेर फिरायला जाताना कोणत्या गोष्टी आपल्या सोबत कॅरी करायला हव्यात हे जाणून घेऊ.


सनस्क्रीन (Sunscreen)


बीचवर (Beach) फिरायला जात असाल तर सनस्क्रीन तुमच्या सोबत ठेवणे खूप गरजेचे आहे. समुद्रात जाण्याआधी संपूर्ण अंगाला सनस्क्रीन लावायला हवी. ज्यामुळे स्किनवर टॅनिंग (Tanning) होणे किंवा सनबर्न (Sunburn) अशा समस्या निर्माण होत नाहीत. त्यामुळे तुमच्या  स्किनला सूट होणारी सनस्क्रीन सोबत ठेवा. योग्य त्या SPF ची सनस्क्रीन सोबत ठेवावी. जास्त SPF ची सनस्क्रीन वापरली तर उन्हाच्या तीव्र किरणांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते. 


सैल कपडे (Baggy Cloths)


बीचवर फिरायला जाताना सोबत कायम हलके किंवा सैल कपडे ठेवावेत. सैल टीशर्ट, बॅगी शॉर्टस स्विमसूट असे कपडे सोबत ठेवावेत. दमट वातावरण असल्याकारणाने टाइट कपड्यामुळे तुम्हाला स्किन इनफेक्शन होऊ शकते. त्यामुळे फिरायला जाताना प्रामुख्याने सैल कपडे तुमच्या बॅगेत पॅक करावेत. 


सनग्लासेस (Sunglasses)


बीचवर जाताना सनग्लासेस सोबत असणे फार गरजेचे आहे. उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करायचे असेल तर सनग्लासचा  वापर करणे गरजेचे आहे. सनग्लासेस बीचवर घालणे हे तुम्हाला  स्टायलिश लूक देऊ शकते. 


वाॅटरप्रूफ बॅग (Waterproof Bag)


पाण्यात जात असाल तर वाॅटरप्रूफ बॅग तुमच्या सोबत ठेवा. यामुळे तुमचे महत्वाचे सामान सुरक्षित राहू शकते.  तसेत या बॅगेत तुम्ही मोबाइल, घड्याळ या गोष्टीही ठेऊ शकतात. 


स्लीपर (Sleeper)


बीचवर गेल्यावर वाळूत चालण्याची मज्जा वेगळी असते. दुपारच्या वेळी वाळूमध्ये चालताना पायांना चटके बसू शकतात त्यामुळे सोबत स्लीपर ठेवणे गरजेचे असते. तसेच बीचवर अनेक  जीव जंतू असू शकतात जे तुमच्या पायांना नुकसान करू शकतात. त्यामुळेही बीचवर स्लीपरचा वापर करावा. 


कॅमेरा (Camera)


हाॅलिडेच्या सुंदर क्षणांना आठवणीत ठेवण्यासाठी तुम्ही कॅमेरा सोबत ठेऊ शकता. याद्वारे तुम्ही प्रत्येक क्षण कॅमेरात कैद करू शकता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मुलीला 'मंगळ' असल्याचं सांगत अत्याचार पीडितेशी लग्न करण्यास आरोपीचा नकार, प्रकरण अॅस्ट्रॉलॉजी विभागाकडे गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI