Surrogacy: सध्या सरोगेसी (Surrogacy) हा चर्चेचा विषय झाला आहे. विविध सेलिब्रिटी हे पालक होण्यासाठी सरोगेसी हा पर्याय निवडतात. अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश हे सरोगेसी द्वारे आई-वडील झाले आहेत. सध्या सरोगसीसंदर्भातील कायद्याबाबत अनेकजण चर्चा करत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही विशेष प्रकरणे वगळता, जानेवारी 2022पासून देशात कमर्शल (commercial) सरोगसी ही बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे नयनतारा आणि विग्नेश यांनी नियमांचे उल्लंघन केलेले असू शकते, असंही म्हटलं जात आहे. आता सरोगेसी म्हणजे काय? आणि सरोगेसीद्वारे पालक होण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. त्याबद्दल जाणून घेऊयात...
सरोगेसी म्हणजे काय?
एखाद्या दाम्पत्याला जर मूल होत नसेल तर ते एका महिलेच्या गर्भामध्ये त्यांचे मूल वाढवू शकतात. ज्या जोडप्याला बाळ हवं आहे, त्या जोडप्यामधील पुरुषाचे शुक्राणू घेऊन प्रयोगशाळेत वैद्यकीय प्रक्रियेद्वारे गर्भ तयार केला जातो. तो गर्भ एका वैद्यकिय प्रक्रियेद्वारे एका महिलेच्या गर्भामध्ये ठेवला जातो. ज्या महिलेच्या गर्भात हे बाळ वाढते, त्या महिलेला 'सरोगेट मदर' असं म्हटलं जातं. 9 महिन्यांनंतर बाळाचा जन्म झाल्यावर, करारानुसार, ते मूल जैविक पालकांकडे सोपवले जाते. (ज्यांच्या शुक्राणूने मूल झाले) सरोगेसीमध्ये देखील काही प्रकार आहेत.
काय आहेत नियम?
सरोगसी नियमन कायदा 2021 नुसार व्यावसायिक सरोगसीला बंदी घालण्यात आली आहे. 25 डिसेंबर 2021 रोजी संसदेने विधेयक मंजूर केले. राष्ट्रपतींनी 25 जानेवारी 2022 रोजी या कायद्याला मान्यता दिली. या कायद्या अंतर्गत व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती, केवळ परोपकारी सरोगसीला परवानगी होती. ‘परोपकारी सरोगसी’ म्हणजे ज्यामध्ये सरोगेट आई पैसे घेणार नाही, फक्त तिला याचा वैद्यकीय खर्च आणि जीवन विमा द्यावा लागतो. नातेवाईकांमधील महिला, मैत्रिणी या सरोगेट मदर होऊ शकतात.
हे सेलिब्रीटी झाले सरोगेसीद्वारे आई-वडील
नयनतारा आणि विग्नेश यांच्याबरोबरच गौरी खान आणि शाहरुख खान तसेच प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे सेलिब्रिटी सेरोगेसीद्वारे आई-वडील झाले. तसेच करण जोहर, एकता कपूर हे सिंगल पॅरेंट सरोगेसीच्या माध्यमातून झाले.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: