Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अनेकजण अनेक प्रकारचे डाएट फॉलो करतात. मात्र, लोकांमध्ये याबाबत जास्त संभ्रम आहे. असं होणं साहजिक आहे, कारण बाजारात असंख्य प्रकारच्या डाएटची माहिती आहे.


वजन कमी करण्यासाठी, काही किटो आहाराची शिफारस करतात, तर काही मेडिटेरियन आहाराची शिफारस करतात. काही लोक वनस्पतीवर आधारित, काही लोक डॅश डाएटसाठी तर काही अधूनमधून उपवासासाठी बोलतात.


आता अशा परिस्थितीत कोणता डाएट फॉलो करायचा? आपल्या शरीरासाठी कोणता डाएट चांगला आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ. 


वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम डाएट कोणता?


वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर सर्वात आधी शरीरासाठी अन्नाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवण्यासाठी योग्य आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वोत्तम आहार केवळ वजन कमी करत नाही तर आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव टाकतो. याबद्दल आपण अधिक माहिती पुढे जाणून घेऊ.


वजन कमी करण्यासाठी मेडिटेरियन आहार सर्वोत्तम 


तज्ञांच्या मते, मेडिटेरियन डाएट हा वजन कमी करण्यासाठी विचारात घेतलेल्या पर्यायांपैकी एक आहे. कारण त्यात भरपूर फायबर असते, त्यामुळे ते पचनासाठी चांगले मानले जाते. एवढेच नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच कर्करोगापासून बचाव करण्यासाठी त्याचे फायदे दिसून आले आहेत. एका अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की मेडिटेरियन आहाराचे पालन करणाऱ्यांना स्ट्रोकचा धोका 30 टक्के कमी असतो.


निरोगी फॅटने समृद्ध आहार


मेडिटेरियन आहारात निरोगी चरबी आणि फारच कमी फॅट असते. याचे पालन केल्याने, तुम्ही अनहेल्दी पदार्थांऐवजी पौष्टिक समृध्द पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. यामुळे त्याचा एकंदर आरोग्याला फायदा होतो.


'या' देशांमध्ये मेडिटेरियन आहाराचे पालन केले जाते


ग्रीस, इटली, स्पेन, पोर्तुगाल इत्यादी देशांमध्ये लोक निरोगी राहण्यासाठी मेडिटेरियन आहाराचे पालन करतात. एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, नट, मासे, फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य इत्यादी मेडिटेरियन पाककृतींमध्ये वापरल्या जातात. या आहारामध्ये, उच्च प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर आणि ट्रान्स फॅटयुक्त पदार्थांचे सेवन प्रतिबंधित आहे.


वजन कमी करण्यात कशी मदत होते?


जर तुम्ही मेडिटेरियन आहाराचे पालन करत असाल आणि दिवसाला 1500 कॅलरी वापरत असाल तर तुमच्या वजन कमी करण्याच्या ध्येयासाठी ते खूप प्रभावी ठरते. अनेक संशोधनांमध्ये याचा उल्लेख देखील केला गेला आहे की, जे लोक या आहाराचे दीर्घकाळ पालन करतात, त्यांचे वजन नियंत्रणात राहते आणि ते तंदुरुस्त आणि फ्रेश वाटतात.