मुंबई : एखादं लहानसं फळही आरोग्यास किती लाभदायक असतं याची प्रचिती देतो खजूर. हजारो वर्षांपासून खजूर सिंधूचं खोरं आणि मध्य पूर्व भागात खाण्यातील महत्त्वाचा घटक ठरला आहे. खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. दर दिवशी फक्त 3 खजूर खाल्ल्यामुळं याचा अतिशय चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होतो. यातीलच एक परिणाम दिसून येतो तो म्हणजे शरीराच्या वजनावर.
खजूर खाल्ल्यामुळं वजन कमी करण्यास मोठी मदत होते. त्यामुळं आहाराच्या दैनंदिन सवयी अर्थात डाएय प्लानमध्ये खजुराचा समावेश करण्याचा फायदाच होणार आहे.
पाहा खजूर खाण्याचे फायदे आहेत तरी काय...
फायबर म्हणजेच लाभदायक कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्त्रोत म्हणून खजुराकडे पाहिलं जातं. ब्लड ग्लूकोज आणि स्निग्ध घटकांचा समतोल राखण्यासाठी याचा फायदा होतो.
खजुरामध्ये असणाऱ्या अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडमुळं इन्सुलिन, किंवा डायबिटीजमुळं शरीराला चढलेली सूज कमी होण्यास मदत होते.
प्रथिनांना स्त्रोत असल्यामुळं भूक शमवण्यासही खजूराची मदत होते. ज्यामुळं भूक फार कमी वेळातच शमवून वजन कमी होण्याच खजुराची मदत मिळते.
खजुरामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्सही मोठ्या फायद्याचे ठरतात.
खजूर आणखी चवदार कसा बनवाल ?
खजुरातील बी काढून त्यात अकरोड किंवा आणखी कोणताही सुका मेवा भरल्यास त्याची चव आणखी सुरेख लागते.
खजुराचे तुकडे साखरेचा पर्याय म्हणून सलाडमध्ये वापरता येऊ शकतात.
दूध, योगर्ट, कस्टर्डसोबतही खजूराची चव चांगली लागते. पण, या साख्या पदार्थांमध्ये खजूर असल्याच रिफाइन्ड साखरेचा वापर टाळावा.
मिठाई किंवा गोडाचा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा असल्यास डाएटला केंद्रस्थानी ठेवता अशा पदार्थांऐवजी खजूर खाणं कधीही उत्तम.