Weight Loss Tips : वजन कमी करण्याच्या बाबतीत, आपलं मेटाबॉलिज्म (चयापचय) महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विशेषतः हिवाळ्यात वजन कमी करणे सोपे नसते. थंडीच्या दिवसात जिममध्ये जाण्याचा किंवा व्यायाम करण्याचा अनेकांना कंटाळा येतो. यासाठी घरच्या घरी राहून आम्ही काही अप्रतिम चवीचे पेय तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतील आणि तुमचं वजनही कमी होईल. फॅट बर्न करण्यासाठी मदत करणार्‍या काही गोष्टी म्हणजे व्यायाम, योग्य आहार घेणे, फॅट बर्न करणारे पदार्थ खाणे आणि रात्री चांगली झोप घेणे. तुमचा चयापचय वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचा सकाळचा व्यायाम. या मेटाबॉलिज्म वाढवणाऱ्या पेयांसह सुरुवात करा. तुम्हाला काही दिवसांत फरक जाणवेल.


चिया सीड्स-लिंबूपाणी


एक कप पाण्यात चिया सीड्स 1-2 तास भिजत ठेवा. भिजवलेल्या चिया सीड्स एका ग्लासमध्ये घाला. त्यानंतर या पेयामध्ये लिंबू पिळून घ्या आणि ½ चमचे त्यात मध घाला. त्यानंतर हे पेय चांगले हलवा. आणि याचं सेवन करा.  


लिंबू-आलं पाणी


हे पेय तयार करण्यासाठी तुम्ही आलं सोलून घ्या आणि त्याचे लहान-लहान तुकडे करा. त्यानंतर ब्लेंडरमध्ये टाका आणि पाणी घाला. ते नीट मिसळा आणि ग्लासमध्ये ओता. यानंतर लिंबाचा रस आणि भाजलेले जिरेपूड घाला. हे मिश्रण चांगले हलवून प्या. तुमचं पेय तयार आहे. 


जिरे-दालचिनी पाणी


इलेक्ट्रिक भांड्यामध्ये 4 चमचे जिरे आणि 2 दालचिनीच्या काड्या टाकून पाणी ठेवा. पाणी नीट उकळू द्या जेणेकरून चांगला कढ येईल.  एका ग्लासमध्ये पाणी गाळून घ्या. या पेयात हलकासा लिंबाचा रस घाला आणि तुमचं हेल्दी पेय तयार आहे. 


ओव्याचे पाणी 


यासाठी ओवा गरम पाण्यात टाका. तो चांगला उकळा. उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून गरम प्या. यामध्ये तुम्ही गूळही घालू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल