Health Care Tips : वजन कमी करण्यासाठी अनेक लोक डाएट प्लॅन फॉलो करतात. तसेच  वेट लॉस करण्यासाठी अनेक लोक जिममध्ये जाऊन वर्क आऊट करतात. झटपट वजन कमी करण्यासाठी तुम्हाला आहारात अंड्याचा समावेश करावा लगेल. अंड तुम्ही ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये खाऊ शकता. अंड्यासोबत जर तुम्ही या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट केल्या तर तुमचे वजन कमी होईल- 


ढोबळी मिर्ची- अंड्यासोबत पिवळ्या रंगीची ढोबळी मिर्ची खाल्याने तुमचे वजन कमी होईल. पिवळ्या ढोबळी मिर्चीमध्ये व्हिटॅमिन सी असते. जर तुम्ही ढोबळी मिर्ची आणि अंड रोज खाल्ले तर तुमचे वजन काही दिवसातच कमी होईल.  
 
काळी मिर्ची पावडर- अंड्यावर काळ्या मिर्चीची पावडर चविनुसार टाकावी. यामुळे अंड टेस्टी होते. काळ्या मिर्चीमध्ये  पिपेरिन असते. ज्यामुळे काळ्या मिर्चीची चव ही थोडी कडू असते. काळी मिर्ची खाल्ल्याने पोटाची आणि कमरेची चरबी कमी होते.  


नारळाचे तेल- फॅट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सोयाबीन तेलामध्ये असणाऱ्या फॅट्समुळे वजन वाढते. पण नारळाच्या तेलामुळे वजन कमी होते.त्यामुळे अंड्याचे ऑम्लेट तयार करताना किंवा अंड्याचा कोणताही पदार्थ तयार करताना नारळाच्या तेलाचा वापर करावा. 


Kitchen Hacks: Chocolate खायला आवडतात? घरीच तयार करा टेस्टी चॉकलेट, जाणून घ्या सोपी रेसिपी


नियमित अंडी खाण्याचे फायदे
अंड्यांचे सेवन आरोग्यास फायदेशीर असते. पण उष्ण प्रकृतीच्या लोकांनी प्रमाणात अंडी खाणे आवश्यक आहे. अंडी खाल्याने नखं आणि केसांना फायदा होतो. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात. नियमित अंडी खाल्याने हाडं बळकट होतात. दररोज 3 अंडी खाल्ल्याने आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा यासारखे आजार सतावत असतात. अंडी खाल्ल्याने हे आजार दूर होतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात. अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते. त्यामुळे तुम्ही ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये  तुम्ही अंडे खाऊ शकता. 


Yoga Benefits And Belly Fat : झटपट वजन कमी करणारी 3 योगासनं; स्लीम अन् ट्रीम होण्यासाठी करतील मदत


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित