Chocolate Recipe : लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट्स खायची आवड असते. डार्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट असे अनेक प्रकारचे चॉकलेट्स बाजारात मिळतात. पण घरच्या घरी  चॉकलेट्स तुम्हाला तयार करायचे असतील तर ट्राय करा ही सोपी रेसिपी-


चॉकलेट्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य-
कोको पावडर 2 कप, बटर तीन चतुर्थांश कप, साखर अर्धा कप, दूध दोन कप, मैदा एक चतुर्थांश कप, पिठी साखर एक चतुर्थांश कप आणि एक कप पाणी


चॉकलेट तयार करायची रेसिपी- 
सर्वप्रथम कोको पावडर आणि बटर फूड प्रोसेसरमध्ये टाका. प्रोसेसरमध्ये याची स्मूथ चॉकलेट पेस्ट तयार करा. आता एका पॅनमध्ये एक चतुर्थांश पाणी टाका पाण्यावर एका बाऊल ठेवा. या बाऊलमध्ये चॉकलेट पेस्ट टाका आणि या पेस्टला गरम करा. त्यानंतर या पेस्टला पुन्हा प्रेसरमध्ये टाकून मिक्स करा. आता दूधाला रूम टेंप्रेचरमध्ये गरम करा. चॉकलेट पेस्टमध्ये साखर, मैदा आणि दूध टाकून मिक्स करा. यामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्या. तयार झालेल्या या मिश्रणाला चॉकलेट मोल्डमध्ये टाका. हे मोल्ड फ्रिजमध्ये ठेवा. चॉकलेट फ्रिजमध्ये कडक होते. तुमचे होम मेड टेस्टी चॉकलेट तयार आहे. 


Katrina Kaif : कतरिनासारखी पर्फेक्ट फिगर हवीये? जाणून घ्या तिचा खास डाएट प्लॅन


चॉकलेटमुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात. यामधील नैसर्गिक तत्वे आपल्याला आनंदी आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतं. विशेषत; चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन आपल्याला आनंदी आणि मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं. चॉकलेटचं सेवन आपल्या हृदयासाठी सुद्धा उत्तम ठरतं. 'डार्क चॉकोलेट' खाण्यामुळे हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.


Yoga Benefits And Belly Fat : झटपट वजन कमी करणारी 3 योगासनं; स्लीम अन् ट्रीम होण्यासाठी करतील मदत


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित


Kumkum Bhindi : काय सांगता? हिरवी भेंडी नाहीतर 'कुमकुम भेंडी'; आरोग्यासाठी अधिक फायदेशीर