weighloss tips: बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव यासह अनेक कारणांनी आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरु होतात. लठ्ठपणा वाढून मधुमेह, रक्तदाबासारख्या रोगांना बळी पडू लागतो. पोटाची चरबी वाढू लागली की त्याचा आपल्या कॉन्फीडन्सवर परिणाम होतो आणि मानसिक स्वास्थही धोक्यात येते. यासाठी आहारासह जीवनशैलीच्या काही महत्वाच्या सवयी लावाव्या लागतील. सकाळी उठल्या उठल्या या सवयी लावल्यास वजन कमी होण्यास मदत होते. महिनाभरात चरबी कमी होऊ लागल्याचं दिसू लागतं असं अनेक तज्ञ सांगतात. कोणत्या आहेत या सवयी?
उठल्यावर ग्लासभर पाणी पिणे
सकाळी उठल्याउठल्या ग्लासभर पाणी पिणं शरिरासाठी अत्यंत फायद्याचं असून पचनक्रीयेसंबंधित असणारे त्रास कमी होण्यास याने मदत होते. ब्रश करण्याच्या आधी पाणी पिलं तर आणखी फायदा होत असल्याचं तज्ञ सांगतात. उठल्यावर पाणी प्यायल्यानं पोटात अन्न साठून राहत नाही, आणि वजन कमी होण्यास मदत होते.
भरपेट नाही सर्व पोषण असणारा नाश्ता करणे
अनेकांना असं वाटतं की सकाळी पोटभर नाश्ता केला तर दिवसभर ऊर्जा टिकून राहते. त्यामुळं ब्रेड, टोस्टपासून गोडाच्या पदार्थांपर्यंत सगळा नाश्ता अनेकजण करताना दिसतात. नाश्ता पोटभरीचा असावा पण त्यात प्रथिनं, जिवनसत्व आणि सर्व पोषणही असायला हवं असं आहारतज्ञ सांगतात. यात अंडी, प्रोटीन शेक यासह आपापल्या आवडीनुसार पदार्थ खाता येतात.
२० मिनिटे तरी शारिरीक हलचाल करा
व्यायाम करायचा म्हणजे केवळ जीममध्ये जायचे असे नाही तर केवळ २० मिनीटं चालल्यानं किंवा कार्डिओ व्यायाम केल्यानंही वजन कमी होण्यात मदत होते.
साखरयुक्त पदार्थ टाळा
साखरयुक्त आणि गोडाधोडाचं खाणं टाळल्यानं शरिरात कॅलरिज जमा होत नाहीत. परिणामी वजन कमी होण्यास मदत मिळते. वेट लॉस करायचा असेल तर साखर असणारे पेयही बंद करावे. चहा कॉफीसारखे पेय बंद करणं शक्य नसेल तर किमान प्रमाण कमी करत करत बंद करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे.
निरोगी आहार घेणे
वजन कमी करण्यासाठी निरेागी आहार घेणं अतिशय आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, फायबरयुक्त पदार्थ, फळे, वरण किंवा पातळ पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, प्रोटीन अशा सर्व पोषण असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. जेवणाची वेळ सारखी ठेवा. रोज त्याच वेळेत जेवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला तज्ञ देतात.
बाहेरचं खाणं टाळा
अनेकदा पाणीपूरी भेळपूरी तसेच स्ट्रीटफुड नकळतपणे खाल्लं जातं. ज्यामुळे अनावश्यक कॅलरीजसह पोषणही होत नाही. पावसाळ्याच्या दिवसात तर बाहेरचं फारसं न खाल्लेलच चांगलं असा सल्ला तज्ञ देतात.