Dinner Mistakes : वाढलेले वजन कमी (Weight Loss) करणे हे सगळ्यात अवघड काम आहे. याकरता तुम्हाला काही खाण्याच्या बाबतीत सवयी बदलणं फार जास्त गरजेचे आहे. बऱ्याचदा लोकांना वाटते की, आपण निरोगी अन्न खायला सुरुवात केल्यास किंवा अगदी एक वेळचे जेवण वगळ्यास त्यांचे वजन कमी होईल. मात्र वजन कमी करण्याकरता जेवण वगळणे हे तुमच्या शरीराकरता धोकादायक ठरू शकते. अवेळी जेवण करणे, जंक फूड खाणे तसेच जेवण वगळणे या कारणांनी तुमचे वजन झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. या चुकांमुळे कमी झालेले वजन परत वाढू शकते. काही लोक रात्रीचे जेवण करताना अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांचे वजन वेगाने वाढू लागते. यामुळेच रात्रीच्या जेवणाची योग्य पद्धत आणि वेळ कोणती आहे आणि रात्री किती आहार घ्यावा हे तुम्हाला माहीत असायला हवे. 


- रात्रीचे जेवण हे हलके असावे. अनेक लोक रात्रीच्या वेळी पचायला अवघड असा आहार  घेतात आणि यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते. 


- रात्रीचे जेवण नेहमी 8-9 च्या दरम्यान करावे. पण आजकाल शहरांमध्ये रात्रीच्या वेळी कामात अडकलेले असतात आणि ज्यामुळे याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. कारण रात्री उशिरा जेवण केल्याने तुमचे वजन तर वाढेलच, शिवाय  अनेक गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतात.


- रात्रीच्या वेळी शक्यतो भूकेपेक्षा कमी जेवण करा.रात्रीच्या वेळी जास्त जेवण केल्याने तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.परिणामी तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.


- रोजच्या आहारात मिठाचा वापर कमी असणे गरजेचे आहे.


- रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेच झोपणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात आणि पचनाशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर रात्रीचे जेवण आणि झोपेमध्ये नेहमी 2-3 तासांचे अंतर ठेवा.


- रात्री सतत उशिरा जेवण्याची सवय असेल तर ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज हे आजार होण्याचा धोका वाढतो. उशिरा जेवल्याने वजन वाढतं, त्यामुळे रक्तातील साखर अनियंत्रित होते. आणि नंतर यामुळे हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या उद्भवतात.


- अनेकदा लोक तक्रार करतात, की त्यांना रात्री लवकर झोप येत नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे उशिरा जेवण. आपले शरीर उशिरा जेवलेले अन्न योग्य प्रकारे पचवू शकत नाही, ज्यामुळे आपली झोप कमी होऊ शकते. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Health Tips : सावधान! अतिपाणी शरीराठी घातक, तासाभरात प्यायला 6 पाण्याच्या बाटल्या, 10 वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली