Weight Loss Tips: आपल्या सर्वांना माहित आहे की, वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे दररोज व्यायाम करणे. पण, आपण हे दररोज करू शकतो का? अनेकांचे उत्तर कदाचित ‘नाही’ असे असेल. याचे कारण म्हणजे कधी थकव्यामुळे, तर कधी कामाच्या व्यस्ततेमुळे आपल्याला दररोज व्यायाम करता येत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की, असे काय करावे ज्याला अधिक वेळ लागणार नाही आणि वजन देखील कमी करता येईल.


तुम्ही देखील अशाच विचारात असाल तर, तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण, झोपेतही वजन कमी होऊ शकते. मात्र, यासाठी तुम्हाला काही वाईट सवयी सोडायला हव्यात. चला जाणून घेऊया अशाच काही सवयींबद्दल...


झोपण्यापूर्वी कोल्ड्रिंक्स पिऊ नका


अनेकजण शरीराला थंडावा देण्यासाठी कोल्ड्रिंक्सचे सेवन करतात. बरेच लोक रात्रीचे जेवण करून झोपण्यापूर्वी थंड पेय पिऊन झोपतात. पण, कोल्ड्रिंक प्यायल्याने फॅट वाढते. त्याऐवजी 30 ग्रॅम प्रोटीन शेक पिऊन झोपल्यास शरीरात भरपूर कॅलरीज बर्न होतात. यासोबतच प्रथिनांमुळे स्नायूंचे आरोग्य सुधारते.


रात्रीचे जेवण हलके असावे


एका दिवसात 4 वेळा अन्न खाणे फार महत्वाचे आहे. यातही रात्रीच्या जेवणाचे विशेष महत्त्व आहे. पण, रात्रीच्या जेवणाच्या वेळी बरेच लोक जड अन्न घेतात, जे योग्य नाही. वास्तविक, रात्री झोपताना मेंदू ग्रोथ हार्मोन रिलीज करतो आणि जर तुम्ही रात्री जास्त खाल्ले किंवा उशिरा खाल्ले असेल, तर ग्रोथ हार्मोन फॅट गोळा करतो, ज्यामुळे वजन वाढते.


रात्री मद्य सेवन करू नका


मर्यादित प्रमाणात अल्कोहोल घेतल्याने शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. पण, बरेच लोक झोपायच्या आधी याचे सेवन करतात, जे आरोग्यासाठी तर हानिकारक आहेच, पण तुमच्या वजनासाठी देखील योग्य नाही. रात्री अल्कोहोल घेतल्याने, झोपताना शरीरातील चयापचय कमी होते. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha