Weight Loss : वाढलेल्या वजनामुळे लोकांना अनेक समस्या जाणवतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन वर्क-आऊट करत असतात. पण जेवण करत असताना काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचे वजन झटपट कमी होईल.
जेवण करत असताना जास्त पाणी पिणे टाळा
जेवण करत असताना पाणी पिळे टाळावे. अन्नासोबत पाणी प्यायल्याने अन्न-पचन करणारी अग्नी मंदावते. या अग्नीला ज्याला पचकाग्नी आणि जठराग्नी देखील म्हणतात. त्यामुळे अन्न पचायला जास्त वेळ लागतो आणि पचनक्रिया बिघडते. त्यामुळे चरबी वाढते.
जेवणासोबत या गोष्टींचे सेवन करणे टाळा
कच्चे सॅलड आणि दही जेवण करत असताना खाऊ नये. ते नेहमी स्नॅक टाइमला खावे. असे केल्याने पचनक्रियेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही आणि वजन देखील वाढत नाही. तसेच जेवण करत असताना भातावर किंवा चपातीवर तूप टाकून खाल्यानंतर पचन क्रिया चांगली होते. त्यामुळे तूपाचा आहारामध्ये समावेश करावा.
मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश जेवणात करु नका. जेवण तयार करताना मोहरीच्या तेलाचा किंवा खोबरेल तेलाचा वापर करा. रात्रीच्या जेवणात मिठ कमी प्रमाणात टाका.
सकाळी मेथीचे दाणे, ओव्याचं पाणी प्यायल्यानं झटपट कमी होईल वजन
मेथीचे दाणे आणि ओव्यामध्ये अँटीऑक्सीडेंट असतात. जे शरीरातील मेटाबॉलिज्म मजबूत करतात. ओवा आणि मेथीचे दाणे मिक्स केलेले पाणी दररोज प्यायल्याने शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स कमी होतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दररोज एक ग्लास ओवा आणि मेथीचे दाणे टाकलेले पाणी प्यायले पाहिजे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :