Weight Loss : काही लोकांना वाढलेल्या वजनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करुन वजन कमी करु शकता. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतील. डाएटमध्ये बदल केल्यानं आणि हा डाएट प्लॅन फॉलो केल्यानं तुमचं वजन झटपट कमी होऊ शकतं. जाणून घ्या डाएट प्लॅन आणि डाएट चार्टबद्दल...
मॉर्निंग वॉटर
दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा. मेथीचे दाणे घातलेलं पाणी प्यायल्यानं तुमचं वजन झटपट कमी होईल. एक चमचा मेथीचे दाणे आणि ओवा एका ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवा. त्यानंतर हे पाणी गरम करुन गाळणीनं गाळा. हे पाणी रोज सकाळी प्या.
बदाम खा
साकाळी 7.30 ते 8 च्या दरम्यान डिटॉक्स पाणी प्यायल्यानंतर आर्ध्या तासानं 4-5 भिजवलेले बदाम खा.
नाश्ता
हे डाएट करताना नाश्त्यामध्ये तुम्ही दोन ब्राऊन ब्रेड्सपासून तयार केलेलं सँडविच खाऊ शकता. 8.30 वाजता नाश्ता करा. एखादं फळ देखील तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर 11 वाजता तुम्ही एक क्लास ताक किंवा टरबूज, पपईचा ज्युस पिऊ शकता.
दुपारचे जेवण
दुपारचे जेवण 1.30 वाजता करा. दुपारच्या जेवणात नाचणीची इडली आणि सांबार खाऊ शकता. ओट्स उपमा आणि भाज्या देखील तुम्ही खाऊ शकता. तुम्ही दिवसातून दोन पोळ्या आणि मिक्स भाज्या आणि अर्धा कप मसूरची भाजी खाऊ शकता. एखाद्या दिवशी तुम्ही ओट्स उपमा, हिरव्या भाज्या, दही घेऊ आणि कोशिंबीरीचा समावेश देखील जेवणात करु शकता.
जेवणानंतर
जेवणानंतर चार वाजता ग्रीन-टी प्या. ग्रीन-टीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो. ग्रीन-टीमध्ये साखर टाकू नका.
रात्रीचं जेवण
रात्रीचं जेवण 7.30 ते 8 वाजता करा. जेवणात ब्राउन राइस आणि वेजिटेबल्सचा समावेश करा. जेवणात तुम्ही मुगाच्या खिचडीचा देखील समावेश करु शकता. झोपण्याआधी आर्धा ग्लास दूध प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :