Vitamins For Health : शरीरासाठी जीवनसत्त्व (Vitamins) फार आवश्यक असतात. शरीरात जर जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर शरीर अनेक संकेत देतात. प्रत्येक जीवनसत्त्वाचे शरीरात वेगळे महत्त्व असते. काही जीवनसत्त्वे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात की, त्यांच्या कमतरतेमुळे कर्करोगासारखा घातक आजार होण्याचा धोका असतो. याशिवाय या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमध्ये इतरही अनेक लक्षणे दिसून येतात. याकडे वेळीच काळजी न घेतल्यास अडचणी वाढू शकतात. शरीरासाठी कोणते व्हिटॅमिन आवश्यक आहेत आणि व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरात कोणते बदल होतात.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कर्करोगाचा धोका
डॉक्टर सांगतात की, व्हिटॅमिन डी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. हे शरीरातील हाडे मजबूत करण्याचे काम करतात. तसेच, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. स्वयंप्रतिकार रोग विकसित होण्याचा धोका कमी करते. याशिवाय शरीरात हे जीवनसत्व असण्याचे महत्त्वाचे काम म्हणजे या जीवनसत्त्वाची शरीरात कमतरता असल्यास अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका असतो.
नैराश्य येऊ शकते व्हिटॅमिन डीची कमतरता
व्हिटॅमिन डी थेट न्यूरोलॉजिकल ऑर्डर नियंत्रित करण्यासाठी कार्य करते. व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास मज्जासंस्थेचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुमच्या शरीरात सतत थकवा येत असेल. जर अजिबात काम करण्याची इच्छा नसेल आणि चालताना त्रास होत असेल तर हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता कायम राहिल्यास व्यक्ती नैराश्य आणि चिंताग्रस्त होऊ शकते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा थेट परिणाम केसांवर दिसून येतो. केस सतत गळत असतील आणि औषधोपचार करूनही ते थांबत नसतील, तर शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी तपासणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन डी वाढवा
संत्री, केळी, पपई आणि इतर फळे आणि भाज्यांच्या सेवनाने शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी वाढवता येते. जर तुम्ही रोज सकाळी अर्धा तास सूर्यप्रकाशात उभे राहिल्यास जीवनात व्हिटॅमिन डीची कमतरता भासू शकत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :