Viral Success Story : इच्छा तेथे मार्ग..! ते म्हणतात ना.. प्रयत्नांना मेहनतीची जोड असेल, तर परमेश्वर फळही गोडच देतो. अशीच एका सामान्य माणसाच्या यशाची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. जी खरंतर सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. मध्य प्रदेशातील राज नवानी यांनी फॅशनच्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 1995 मध्ये त्यांनी 5 लाखांचे कर्ज घेऊन एक कपड्यांचे छोटे दुकान सुरू केले. आज त्यांचा ब्रँड अनेक बड्या स्टार्सची पसंती बनला आहे. राज नवानी यांची कथा ही संघर्ष आणि यशाचे उत्तम उदाहरण आहे. जाणून घेऊया त्यांचा यशाचा प्रवास...
एका छोट्या दुकानातून प्रवास सुरू झाला...
मध्य प्रदेशातील दमोह येथील एका छोट्याशा शहरातील राज नवानी यांचा छोट्या कपड्यांच्या दुकानापासून सुरू झालेला प्रवास आज 150 कोटी रुपयांच्या व्यवसायात बदलला आहे, राज नवानी यांचा पुरुषांच्या कपड्यांचा ब्रँड 'नोस्ट्रम' नावाचा मोठा व्यवसाय आहे. 1995 मध्ये 'सॉरी मॅडम' नावाच्या छोट्याशा दुकानातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पेहरावापर्यंत पोहोचला आहे. राज यांनी 5 लाखांचे कर्ज घेऊन त्यांनी व्यवसायाचा प्रवास सुरू केला होता.
तरुण वयात व्यवसायात प्रवेश केला
बायोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, वयाच्या 23 व्या वर्षी, राज नवानी यांनी त्यांच्या वडिलांच्या कपड्यांच्या दुकान 'जय जवान जय किसान' मधून प्रेरणा घेऊन व्यावसायिक जगात प्रवेश केला. त्यांचे 'सॉरी मॅडम' हे दुकान लवकरच शहरात प्रसिद्ध झाले.
आता कोट्यवधींची उलाढाल, 250 हून अधिक लोकांना रोजगार मिळवून दिला
कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीने, राज नावानी यांनी आपल्या छोट्याशा दुकानाचे 'नॉस्ट्रम फॅशन प्रायव्हेट लिमिटेड' नावाच्या मोठ्या कंपनीत रूपांतर केले. 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांच्या कंपनीची उलाढाल 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. आता येत्या दोन वर्षांत ते 500 कोटींवर नेण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. 250 हून अधिक लोकांना रोजगार देणारी ही कंपनी सतत प्रगती करत आहे.
सर्व नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी
'नोस्ट्रम' ब्रँड आज देशभरात 1,500 हून अधिक मल्टी-ब्रँड आउटलेट्स आणि 100 हून अधिक शॉप-इन-शॉप (SiS) ठिकाणी उपलब्ध आहे. राज नवानी यांची कथा फॅशन जगतात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या सर्व नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.
हेही वाचा>>>
Viral : भारत फिरला पण ढसाढसा रडला! एक चूक अन् ब्रिटीश इन्फ्लुएंसर थेट पोहचला रुग्णालयात, नेमकं काय घडलं?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )