Viral: आजकालच्या तरुण पिढीमध्ये डेटवर जाणं कॉमन झालंय. दोन अनोळखी लोक एकमेकांना भेटतात, एकत्र वेळ घालवतात, आणि विचार जुळायला लागल्यावर मग लग्नाचा किंवा रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. ते म्हणतात ना.. आजकाल कोणावर विश्वास ठेवणं कठीण झालंय. अशात जर तुम्ही डेटवर जात असाल तर सावधान..! एका तरुणाला याच रोमँटिक डेटवर जाणं इतकं महागात पडलंय की, त्याचा जीव अक्षरश: धोक्यात होता, असं काय घडलं? जाणून घ्या..
डेटवर गेला, पण फसवणुकीचा बळी ठरला..!
गाझियाबादमध्ये एक घटना समोर आली आहे, जिथे एक तरुण डेटवर गेल्यावर एक फसवणुकीचा बळी ठरली आहे. एका व्यक्तीने सांगितले की, तो 21 ऑक्टोबरला डेटला जाणार होता, ज्याचे आमंत्रण व्हॉट्सॲपवरून आले होते. मात्र, हा सापळा असू शकतो हे त्या व्यक्तीला समजले नाही. मेसेजमध्ये त्याला कौशांबी या मेट्रो स्टेशनवर भेटायला बोलावलं होतं. मात्र तिथे त्याच्यासोबत असे काही घडले, ज्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला. या डेटिंग स्कॅमशी संबंधित संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.
ताबडतोब लाईव्ह लोकेशन मित्रासोबत शेअर केले
स्टेशनवरून त्या व्यक्तीला कौशांबी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या टायगर कॅफेमध्ये नेण्यात आले. कॅफेमध्ये पोहोचल्यावर, त्या व्यक्तीला जरा संशयास्पद वाटले कारण तेथे ना चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी होती ना कोणताही साइनबोर्ड. परिस्थिती गडबड असल्याचे लक्षात येताच त्याने ताबडतोब त्याचे लाईव्ह लोकेशन आपल्या मित्रासोबत शेअर केले आणि मेसेजद्वारे संपूर्ण परिस्थिती सांगितली.
कोल्ड ड्रिंकचे बिल चक्क 16,400 रु?
तिथून निघून जाण्याचा विचार करताच त्याची शंका विश्वासात बदलली. यावेळी कॅफेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासमोर 16,400 रुपयांचे बिल ठेवले, जे मुलीने ऑर्डर केलेल्या कोल्ड्रिंकचे बिल होते. त्यासाठी त्याने नकार दिल्याने कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर जाण्यापासून रोखले आणि जबरदस्तीने 50 हजार रुपयांची मागणी केली.
मित्राने केली मदत
चांगली गोष्ट म्हणजे त्याने सर्व परिस्थिती आपल्या मित्राला सांगितली होती, त्यामुळे त्याच्या मित्राने पोलिसांशी संपर्क साधला आणि लगेच कारवाई करण्यात आली. या कारवाईत डेटिंग घोटाळ्यात सहभागी असलेल्या एका गटाचा पर्दाफाश करण्यात आला, ज्यामध्ये 5 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. यापैकी 4 महिला दिल्लीतील होत्या, ज्यांनी वेगवेगळ्या डेटिंग ॲप्सवर प्रोफाइल तयार केले होते. ती अज्ञात पुरुषांना टायगर कॅफेमध्ये घेऊन जायची, जिथे त्यांच्याकडून खाण्यापिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जात होते. यानंतर संपूर्ण रक्कम भरेपर्यंत लोकांना ओलीस ठेवण्यात आले.
हेही वाचा>>>
Viral: कर्मचाऱ्याचा झाला अपघात, बॉसने सोडली माणुसकी! 'असा' मेसेज पाठवला की भडकले नेटकरी, संभाषणाचा स्क्रीनशॉट व्हायरल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )