Viral: आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, अनेक लोक Reels बनवून त्यावर शेअर करतात, जर रील आवडला तर त्यावर अनेक कमेंट्स, लाईक्स येतात. आजकालच्या धावपळीच्या युगात अनेकांना वेळ साधणं जमत नाही. अशात एका प्रवाशाला फ्लाईटसाठी उशीर झाला, म्हणून त्याने चक्क प्रॅंकच्या नावाखाली खोटं बोलत पत्नी गरोदर असून त्याच्यासाठी पोहोचणे खूप महत्त्वाचे असल्याचे सांगून विमानतळावरील एअरलाइन्स कर्मचारी आणि इतर प्रवाशांची खिल्ली उडवणे सुरू केले. असे करणे या प्रवाशासाठी अत्यंत महागात पडले असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यावर लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केलंय.
"माझी पत्नी गरोदर आहे, मला जाऊ द्या.."
विमानतळावरील प्रँकिंगमुळे प्रवाशाला चांगलंच महागात पडल्याचे दिसते. जेव्हा त्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा लोकांनी त्याला चांगलेच फटकारले. फ्लाईटसाठी उशीर झाल्यानंतर प्रवाशाने पत्नीबाबत खोटं बोलायला सुरुवात केली. मात्र, जेव्हा लोकांना त्याचे सत्य समजले तेव्हा त्यांनी त्याला ट्रोल केले आणि त्याला जोरदार फटकारले.
प्रवाशाने केलेली मस्करी त्याच्याच आली अंगलट!
स्पाईसजेटचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांवर प्रँक करत असल्याचा व्हिडीओ प्रवाशाने रेकॉर्ड केला होता. तो प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सांगत होता की, “फ्लाइटला उशीर होत आहे, तो आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळी उपस्थित राहू शकणार नाही.” यानंतर त्याने सांगितले की, माझे कारण ऐकल्यानंतर अनेक लोक माझ्या बाजूने एअरलाइन कर्मचाऱ्यांशी भांडत आहेत.
विमानतळावरच प्रँकिंग सुरू! नेटकऱ्यांची टीका
विमानाला उशीर झाल्यानंतर तो इतर प्रवाशांना विमान कंपनीबद्दल वाईट बोलत होता. त्यात काही लोकही सामील झाले. यानंतर तो असेही म्हणाला की, मला नेहमी संतप्त जमावाचा भाग व्हायला आवडते, असे म्हणत विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ओरडतो. तो गमतीने कर्मचाऱ्यांना म्हणतो, “माझ्यासाठी हे फ्लाइट पकडणे खूप महत्त्वाचे आहे. माझी पत्नी रुग्णालयात आहे.” हे ऐकून काही प्रवाशांनी त्यांच्या बाजूने कर्मचाऱ्यांशी वाद घातला. नंतर, प्रवाशाने स्वतः सांगितले की तो विनोद करत आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, त्यानंतर तो व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर मोठ्या संख्येने लोक त्याच्यावर टीका करत आहेत.
नेटकरी संतापले...
एकाने लिहिले की कंटेंट तयार करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की लोक खोटे बोलण्यासाठी त्यांच्या ज्येष्ठ लोकांच्या निधनाच्या बातम्या सांगतात, परंतु पत्नीची प्रसूती होणार आहे असं खोटं सांगणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हायला हवी, इतरांना त्रास देण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी असा मजकूर तयार करणाऱ्यांला शिक्षा व्हायला हवी, असे एकाने लिहिले आहे.
हेही वाचा>>
Health: लवकर म्हातारपण नको, म्हणून Anti-aging उपचार केला, 'असा' फसला की दृष्टी गेली, चेहरा सुजला!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )