Phone Addiction Tips : लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच हाहात सध्या स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनचे (Smartphone) जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेदेखील आहेत. स्मार्टफोनमुळे अनेकांचे नुकसान होते. फोनचा चुकीच्या पद्धतीने वापर करणं चूक आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
कुटुंबापासून दूर
फोनचा अतिवापर केल्याने वापरकर्ता त्याच्या कुटुंबापासून दूर जाऊ शकतो. शाळा-कॉजेलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून, ऑफिसमधील कर्मचारी ते घर सांभाळणारी स्त्रीदेखील तिचा जास्तीत जास्त वेळ फोनमध्ये घालवते. फोनचा अतिवापर करणारे एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठीदेखील फोनचा वापर करतात आणि कुटुंबापासून दूर जातात.
समस्या वाढतात
फोनचा अतिवापर करणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रिसर्चनुसार, फोनचा अतिवापर केल्याने तुमचा मूड कोणत्या कारणाविना खराब होऊ शकतो. फोनचा अतिवापर केल्याने आस-पास घडणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहता. जे अत्यंत वाईट आहे.
मुलांच्या मनावर वाईट परिणाम
स्मार्टफोनचा अतिवापर केल्याने मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. लहान मुलं त्यांच्या आई-वडीलांना फॉलो करत असतात. जर आई-वडील फोनचा वापर करत असतील तर मुलंदेखील ते करायला बघतात. त्यामुळे मुलांसमोर फोनचा जास्त वापर करणं टाळावा.
अवांतर वाचन
मोबाईलच्या अति वापरामुळे ब्रेनट्यूमर, कर्करोग, आम्ब्लोपियासारखे भीषण परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे अवांतर वाचन हा यावरील उत्कृष्ट पर्याय आहे. वाचनामुळे बौद्धीक क्षमता वाढून आकलन शक्ती वृद्धींगत होईल.
एकाग्रतेचा अभाव
स्मार्टफोनच्या वापराने एकाग्रता कमी होते. तसेच शारीरिक आणि मानसिक ताण पडतो. लहान मुले अभ्यास करताना, खेळताना इंटरनेटचा वापर करतात. त्यामुळे त्यांची एकाग्रता कमी होते. एकाग्रता कमी झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या