पित्त, अल्सर, संसर्ग अनेक आजारांवर गुणकारी मेथी
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2017 03:30 PM (IST)
1
वारंवार तोंड येत असल्यास मेथी उकळलेल्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो. या पाण्यानं पोटातील अल्सरही बरा होतो.
2
दररोज मेथीचा लाडू खाल्यानं वातानं जखडलेलं अंग मोकळं होतं.
3
मेथी अनेक आजारांवर गुणकारी औषध आहे. चवीला कडवट असली तरीही मेथी आरोग्यवर्धक आहे.
4
मेथीमुळे
5
मेथीमुळे अॅसिडिटी, गॅसेस, बद्धकोष्ठता, जुलाब, मुळव्याध असे अनेक आजार मेथी खाल्ल्यानं बरे होतात.
6
घशाला सूज आली असल्यास मेथी घालून गरम केलेल्या पाण्याने गुळणी केल्यानं आराम मिळतो.
7
मेथीमध्ये अँटी व्हायरल गुण असल्यानं श्वसन मार्गातील संसर्ग मेथी दूर करते.
8
मेथीच्या कोवळ्या पानांची भाजी खाल्ल्यानं मूळव्याध किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
9
मेथी पित्तनाशक आहे. मेथीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.