इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराटचा नवा विक्रम
धोनीनंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांने 50.62 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्णधार म्हणून विराट कोहलीने 18 सामन्यात 972 धावा केल्या आहे. यात 5 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
यासोबतच कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. 10 पेक्षा जास्त डाव खेळणाऱ्या कर्णधारांमध्ये सर्वाधिक सरासरी असलेला कर्णधार बनला आहे. कर्णधार म्हणून विराटची सरासरी 74.76 असून तो या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
यानंतर संपूर्ण जबाबदारी भारतीय संघाच्या फलंदाजांवर आली. कर्णधार विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत 105 बॉलमध्ये 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 27वं शतक ठोकलं. तर केदार जाधवसोबत पाचव्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी रचत टीम इंडियाला विजयपथावर नेलं.
पुण्यातील या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण इंग्लंडने 350 धावा केल्या. परिणामी भारतासमोर 350 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं.
कर्णधार विराट कोहलीचं शानदार शतक आणि केदार जाधवच्या धुँवाधार खेळीमुळे टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात 3 विकेट्सनी रोमहर्षक विजय मिळवला.
तर पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ आहे. कर्णधार म्हणून त्याची सरासरी 48.16 आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. कर्णधार म्हणून त्याची सरासरी 53.92 आहे.
विराटनंतर या यादीत एबी डिव्हिलियर्सचं नाव येत. कर्णधार म्हणून एबीने 65.92 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -