Viral Video : आजकालच्या डिजीटलच्या युगात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आपल्याला कधी एखादा पदार्थ खाण्याची लहर आली की, आपण लगेच झोमॅटो..स्विगी..किंवा इतर फूड डिलीव्हरी अॅपवरून ऑर्डर करतो, आणि मग काही मिनीटातच गरमागरम आपल्याला हवे ते पदार्थ घरी येऊन पोहचतात. पण त्यामागे त्या डिलीव्हरी बॉयची किती मेहनत असते, याची अनेकांना कल्पना नसते, पाऊस असो किंवा ट्राफिक, तुमच्यापर्यंत पदार्थ पोहचवण्याचे त्यांचे लक्ष्य असते.  अशाच एका झोमॅटोचा डिलिव्हरी बॉयचा मुंबईतील झोपडपट्टीतील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो कसा जगतो हे सांगितले आहे. त्याच्या व्हिडीओमुळे अनेकजण प्रभावित झाले. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही तोडांतून अरेरे... असे आल्याशिवाय राहणार नाही. जाणून घ्या...



स्वप्नांच्या शहरात तरुणांचे जगणे कठीण?
  


मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटले जाते आणि ते राहण्यासाठी सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. अलीकडे, एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामध्ये त्याने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील झोपडपट्टीत 500 रुपयांच्या मासिक भाड्यावर कसा राहतो हे सांगितले आहे. हा मुलगा ईशान्येचा रहिवासी असून त्याचे नाव प्रंजॉय बोरगोयरी कामाच्या शोधात मुंबईत आला होता. त्याची सध्या परिस्थिती अशी आहे की, तो आता अनेक रूम पार्टनर्ससह मोठ्या अडचणीत आपले जीवन जगत आहे. व्हिडिओमध्ये तो त्याच्या खोलीकडे जाणारी अरुंद गल्ली दाखवतो आणि त्याच्या खोलीला जोडलेला जिना दाखवतो.


 






 



व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल



झोमॅटोचा डिलिव्हरी प्रंजॉय बोरगोयेरी याने अलीकडेच मुंबईतील एका झोपडपट्टीतील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कसा जगतो हे सांगितले आहे. व्हिडीओमध्ये त्याने सांगितले की, तो 500 रुपये मासिक भाड्यावर झोपडपट्टीत राहतो. व्हिडिओत तुम्ही डिलिव्हरी बॉयच्या एका मित्राला पाहू शकतात, ज्याला तो सोनू भाई म्हणतो, जो पायऱ्या चढून खोलीत जातो. यानंतर काम करणारा मुलगा त्याच्या इतर रूममेट्सना आणि त्यांचे सामान घरात पडलेले दाखवतो. प्रंजॉयने एक मांजरही पाळली आहे. ती व्हिडीओमध्ये दिसत आहे.



व्हिडीओमध्ये मुलाने सांगितली परिस्थिती


व्हिडीओमध्ये हे लोक 50 रुपयांना विकत घेतलेल्या बिर्याणीचे पॅकेट खाताना दिसत आहेत. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने सांगितलं की त्याला अनेक आरोग्यविषयक आजार आहेत आणि त्याच्या उपचारासाठी त्याच्या कुटुंबाला खूप पैसे गमवावे लागले. या कारणास्तव, तो त्याच्या कुटुंबाकडून आणखी पैसे घेऊ शकत नाही आणि त्याला असा संघर्ष करावा लागतो. या कठीण परिस्थितीतही, त्याला जगण्याची प्रेरणा वाटते, तसेच तो म्हणतो की तो त्याच्या गाणं इंस्टाग्रामवर अपलोड करत राहील. माहितीनुसार, हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.आणि त्यापैकी एकाने तीन महिन्यांचे भाडे उदारपणे दिले आहे.


 


हेही वाचा>>>


Trending : 'मायक्रोसॉफ्टचा बाप भारतीय रेल्वे!' सोशल मीडियावर मायक्रोसॉफ्ट ट्रोल, भारतीय रेल्वेचं मात्र भरभरून कौतुक, काय कारण आहे?


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )