Travel Tips : प्रत्येकाला कुटुंब आणि मित्रांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जावं असं वाटतं. पण, काही लोक प्रवास करण्यास टाळाटाळ करतात, कदाचित त्यांचा मागील प्रवासाचा अनुभव चांगला नसल्यामुळे ते प्रवासाला जातच नाहीत. प्रवासात सगळ्यांनाच आपल्या तब्येतीची खूप काळजी असते. कारण प्रवासादरम्यान अनेकांना उलट्या, अस्वस्थता, डोकेदुखी आणि पोटदुखी यांसारख्या आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. काहीजण घरी आल्यानंतर आजारी पडतात. त्यामुळे लोक प्रवास करण्यास टाळाटाळ करतात.


पण, अशा परिस्थितीत प्रत्येकाने प्रवास करताना आपल्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी काही खबरदारी घ्यायला हवी. कारण त्यांच्याकडून काही निष्काळजीपणा त्यांच्या समस्येला कारणीभूत असण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान आपण आपल्या फिटनेसची काळजी कशी घेऊ शकतो हे जाणून घेऊयात.


आरोग्यदायी पदार्थ खा


प्रवास करताना खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी न घेतल्यास आरोग्य बिघडू शकते. प्रवासादरम्यान डिहायड्रेशनमुळे चिंताग्रस्त होणे, उलट्या होणे किंवा डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रवास करताना आरोग्यदायी पदार्थ खा आणि पाणी प्या. जेणेकरून तुमचे शरीर हायड्रेटेड राहील. सफरचंद, डाळिंब, पेरू यांसारखी काही फळे तुम्ही घरून घेऊन जाऊ शकता. 


फिटनेस फ्रिक


जर तुम्ही फिटनेस फ्रिक असाल आणि तुमची दिनचर्या खंडित करू इच्छित नसाल, तर यासाठी तुम्ही तुमची जंपिंग रोप आणि योगा मॅट सोबत घ्या. ज्याच्या मदतीने तुम्ही हॉटेलच्या खोलीत किंवा बाहेर बागेत व्यायाम करू शकाल. यामुळे तुमचे व्यायामाचे वेळापत्रक बिघडणार नाही.


चांगली झोप


प्रवास करताना तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे सहलीचा आनंद घेण्याबरोबरच विश्रांती घ्या आणि 7 ते 8 तासांची झोप घ्या. यामुळे प्रवासादरम्यान येणारा ताण आणि थकवा यापासून आराम मिळेल.


आवश्यक औषधे घ्या


बाहेर फिरायला जाताना कुणालाही किरकोळ दुखापत होऊ शकते किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे यासाठी काही औषधे नेहमी बरोबर ठेवा. जर तुमच्यापैकी कोणी आधीच मधुमेह आणि बीपीचा रुग्ण असेल तर त्यांची औषधे तसेच शुगर आणि बीपी टेस्टिंग मशीन बरोबर ठेवा.


डॉक्टरांचा सल्ला घ्या


तुम्हाला आधीच काही आरोग्य समस्या असल्यास, प्रवास करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि प्रवासादरम्यान तुमच्या आहाराची आणि विश्रांतीची काळजी घ्या.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : मोबाईलचा अति वापर तुमच्या मुलाच्या आरोग्यासाठी घातक; काय आहे मायोपिया? हे कसं टाळाल? वाचा सविस्तर