Travel : भारतात अनेक अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी आहेत. ज्याचा शोध अद्यापही वैज्ञानिकांनी लागलेला नाही. त्याचप्रमाणे भारतात अशी अनेक पवित्र आणि लोकप्रिय मंदिरं आहेत. जी अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये आढळतात, जिथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका मंदिराविषयी सांगणार आहोत, जे वर्षातील सुमारे 8 महिने पाण्यात बुडलेले असते. तसेच या ठिकाणी स्वर्गात जाण्याचा मार्ग देखील असल्याचं सांगण्यात येतं, नेमकं सत्य काय? काय आहे त्यामागील इतिहास? जाणून घ्या.


 


भारताला मंदिरांचे माहेरही म्हटले जाते


भारतात असलेल्या काही चमत्कारिक मंदिरांमुळे या देशाला मंदिरांचे माहेरही म्हटले जाते. म्हणूनच अनेक लोक भारताला अध्यात्मिक देश मानतात. भारतातील काही मंदिरे अगदी देवाचे भौतिक रूप मानली जातात. भारतातील इतर राज्यांप्रमाणे हिमाचल प्रदेशातही अनेक पवित्र आणि प्राचीन मंदिरे आहेत. जसे की चामुंडा मंदिर, ज्वाला देवीचं मंदिर, हिडिंबा मंदिर आणि भीमकाली मंदिर. हिमाचलमधील इतर मंदिरांप्रमाणे, बाथू की लडी मंदिर देखील एखाद्या चमत्कारिक मंदिरापेक्षा कमी नाही. आज आम्ही तुम्हाला बाथू की लडी मंदिराशी संबंधित पौराणिक कथा आणि रहस्यमय कथांबद्दल सांगणार आहोत.





हिमाचलमध्ये हे मंदिर कोठे आहे?


हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात बाथू की लडी मंदिर आहे. हिमाचलची राजधानी शिमला पासून बाथू की लडी मंदिर सुमारे 278 किमी अंतरावर आहे. याशिवाय ते धर्मशाळेपासून 64 किमी आणि मॅक्लिओडगंजपासून सुमारे 70 किमी अंतरावर आहे.


 



काय आहे मंदिराचा इतिहास?


बाथू की लडी मंदिराच्या इतिहासाबाबत वेगवेगळी मते आहेत. गुलेरिया साम्राज्याच्या काळात हे मंदिर सहाव्या शतकात बांधण्यात आले होते, अशी या मंदिराविषयी एक धारणा आहे. बाथू की लडी मंदिराबाबत आणखी एक आख्यायिका अशी आहे की ते पांडवांनी बांधले होते. होय, असे म्हणतात की पांडवांनी वनवासात पूजेसाठी हे मंदिर बांधले होते.


 


 


काय आहे मंदिराची पौराणिक कथा?


या मंदिराची पौराणिक कथा खूप मनोरंजक आहे. होय, हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे असे अनेक लोक मानतात, तर काही लोकांच्या मते हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित आहे. पांडवांनी वनवासात येथे शिवलिंगाची स्थापना केली होती असाही अनेकांचा समज आहे. बाथू की लडी मंदिराविषयी असे म्हटले जाते की मंदिराच्या तळाशी पायऱ्या आहेत. पौराणिक कथेनुसार, या पायऱ्या सामान्य नाहीत, परंतु स्वर्गात जाण्याचा मार्ग प्रदान करतात. बाथू की लडी मंदिरात आजही पायऱ्या दिसतात असे म्हणतात.





या मंदिराशी संबंधित रहस्यमय कथा


बाथू की लडी मंदिराशी संबंधित रहस्यमय कथा लोकांना आश्चर्यचकित करतात. होय, या मंदिराबाबत असे म्हटले जाते की, हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. असे म्हटले जाते की या मंदिराच्या संकुलातील खडकांवर भगवान विष्णू, शेष नाग आणि देवी इत्यादींची शिल्प रहस्यमय कथा दर्शवतात. बाथू की लडी मंदिराविषयी असेही म्हटले जाते की, ते वर्षातील सुमारे 8 महिने महाराणा प्रताप सागर तलावात बुडलेले असते आणि या काळात कोणीही भेट देण्यास धजावत नाही. बाथू की लडीबद्दल आणखी एक रहस्यमय कथा अशी आहे की आजही येथे स्वर्गात जाण्यासाठी 40 पायऱ्या आहेत, ज्या पाहता येतात. अनेक लोक या पायऱ्यांची पूजाही करतात. याशिवाय या मंदिर परिवारात एक दगड असल्याचेही सांगितले जाते आणि दगडावर गारगोटी मारली असता दगडातून रक्त बाहेर येते.


 


या मंदिराला भेट देता येईल का?


जर तुम्ही बाथू की लडी मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की होय, तुम्ही हे मंदिर सहजपणे एक्सप्लोर करू शकता. यासाठी तुम्ही मे ते जून महिन्यात फेरफटका मारण्यासाठी जाऊ शकता, कारण या दोन महिन्यांत महाराणा प्रताप सागर तलावाची पाण्याची पातळी खूपच कमी राहते.


 


हेही वाचा>>>


Travel : भारतातील एक दैवी शक्तीपीठ! 'येथे' पडला होता देवी सतीच्या स्तनाचा तुकडा? 'अशी' करा ट्रीप प्लॅन


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )