Travel : पावसाळा जेव्हा सुरू होतो, तेव्हा तो आपल्या सोबत एक आल्हाददायक रोमॅंटीक वातावरण, थंडावा, हिरवीगार झाडे आणि निसर्गसौंदर्याची उधळण करत येतो. याचा नुसता विचार करून प्रत्येकाला पावसाळ्यातीस प्रवास हवाहवासा वाटतो. अशात जर सोबत तुमचा जोडीदार असेल, तर मग क्या बात है..! मान्सूनचे आगमन होताच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पर्यटकांची गर्दी होताना दिसते, मात्र जे मुंबई-पुणे जवळ राहतात. त्यांच्यासाठी पुण्याजवळील डोंगर आणि जंगलातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी तसेच पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी हजारो लोक येतात. पावसाळ्यात जणू काही लोक या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत असतात. तर अनेकजण सुट्टीच्या अनुषंगाने प्रवास करण्याचा बेत आखतात, तर अनेकजण आधीच सुट्टी घेऊन पावसात बाहेर फिरायला जातात. अशात, जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासह पावसाळ्याचा आनंद अनुभवायचा असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. 




 


पवना तलाव - हे ठिकाण तुम्हाला निराश करणार नाही...!


पुणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जर तुम्हाला जोडीदारासोबत पाऊस अनुभवायचा असेल तर, लोणावळा रेल्वे स्थानकापासून पवना तलाव सुमारे 20 किमी अंतरावर आहे. येथील तलावाचा आकार आणि आजूबाजूचे दृश्य हे ठिकाण आणखीनच सुंदर बनवते. येथे तुम्ही कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पावसाळ्यात फिरण्यासाठी एखादे चांगले ठिकाण शोधत असाल तर कोणताही विचार न करता येथे जा. हे ठिकाण तुम्हाला निराश करणार नाही.




एम्प्रेस गार्डन - प्रसिद्ध पिकनिक स्पॉट्सपैकी एक


हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध पिकनिक स्पॉट्सपैकी एक मानले जाते. इथे अनेक प्रकारची फुलं बघायला मिळतात. या बागेत विविध प्रकारची झाडे लावली जातात. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत पुण्याजवळ कुठेतरी हिरव्यागार निसर्गाचा आनंद पाहायला जायचे असेल तर तुम्हाला पावसाळ्यात हे ठिकाण आवडेल. हिरव्यागार झाडांनी वेढलेले हे ठिकाण पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसते.





पर्वती टेकड्या - पावसाळ्यात अद्भुत दृश्यांसाठी ओळखली जाते


पुण्यातील पर्वती टेकड्यांवरील सुंदर दृश्य पाहण्यासारखे आहे. सुंदर प्राचीन मंदिर आणि आजूबाजूला पसरलेले नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी लोक येथे येतात. पर्वती हिल्स, समुद्रसपाटीपासून 2,100 फूट उंचीवर, पावसाळ्यात त्याच्या अद्भुत दृश्यांसाठी ओळखली जाते. येथे तुम्हाला इंद्रधनुष्याचे सुंदर दृश्यही पाहायला मिळेल.





मुळशी धरण - हिरवळ आणि शांत वातावरणाचा अनुभव


पुण्यापासून जवळ असलेले मुळशी धरण हे आजूबाजूला हिरवळ आणि शांत वातावरणाचा अनुभव देते. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत शांत ठिकाणी जायचे असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. मुळशी तलावाचे सौंदर्य मुळशीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या 'वळणेवाडी' येथून पाहता येते. लोक येथे शांततेत तासन्तास घालवण्यासाठी येतात.


 


शनिवार वाडा - इतिहासाच्या दृष्टिकोनातून सर्वात खास


पुण्यातील शनिवार वाडा हा इतिहासाच्या दृष्टिकोनातून सर्वात खास मानला जातो. आजूबाजूचे दृश्य पावसाळ्यात हे ठिकाण आणखीनच सुंदर बनवते. शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वाराला लोक दिल्ली दरवाजा म्हणतात.


 


 


हेही वाचा>>>


Travel : Weekend आहे खास, सोबत बहरलेला निसर्ग! पावसात महाराष्ट्रातील 'हे' धबधबे फिरायला विसरू नका


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )