Travel : मुलांच्या परीक्षा संपल्या, उन्हाळी सुट्ट्या लागल्या, आता कुठे तरी फिरायला जायचा प्लॅन तुमच्याही कुटुंबात होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही ट्रीप एन्जॉय करू शकता, अशी भारतीय रेल्वेची (Indian Railway) काही पॅकेजेस बद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची ट्रीप अगदी सोयीस्कर होईल. या पॅकेजमध्ये हॉटेल बुकींग, खाणं पिणं, वैगेरे सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. जाणून घ्या..


फक्त तिकीट बुक करा, बाकी सगळं भारतीय रेल्वे पाहील..


तसं बघायला गेलं तर कुटुंबासोबत सहलीला जाताना पालक खूप विचार करतात. कारण प्रवासादरम्यान सर्व तयारी त्यांना एकट्यानेच करावी लागते. तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल तर त्यासाठी आधी बजेट प्लॅन बनवावा लागतो. यानंतर, तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी तिकीट, राहण्यासाठी हॉटेल, भेट देण्याची ठिकाणे आणि निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी बस सुविधा यासारखी तयारी सुरू करता. सर्व तयारी करूनही तुमचं समाधान होत नाही आणि काही ना काही राहतचं. या ट्रिपमुळे लोक अनेकदा फॅमिली ट्रिप प्लॅन रद्द करतात. पण आता तुम्हाला ते करण्याची गरज नाही. कारण तुम्ही भारतीय रेल्वेच्या टूर पॅकेजमधून प्रवास करण्याची योजना करू शकता. पॅकेजमध्ये तुम्हाला फक्त तिकीट बुक करावे लागेल. यानंतर, भारतीय रेल्वे तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी रेल्वे तिकीट, हॉटेल आणि प्रवास सुविधांची काळजी घेते.


कन्याकुमारी, तिरुपती आणि त्रिवेंद्रम टूर पॅकेजेस


हे पॅकेज 3 मेपासून सुरू होणार आहे.
हे पॅकेज 11 रात्री आणि 12 दिवसांसाठी आहे. ही सर्व ठिकाणे मे महिन्यात भेट देण्यासाठी चांगली आहेत.
पॅकेजसाठी, तुम्ही अजमेर, भिलवाडा, चित्तोडगड, जयपूर आणि उदयपूर येथून ट्रेन घेऊ शकता.
पॅकेज फी - 2 लोक आणि 3 लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 35,860 रुपये आहे.
मुलांसाठी तुम्हाला 27,490 रुपये वेगळे द्यावे लागतील.
पॅकेजमध्ये खाद्यपदार्थ, हॉटेल, रेल्वे तिकीट आणि प्रेक्षणीय स्थळांसाठी एसी आणि नॉन-एसी बसची सुविधा समाविष्ट आहे.



अल्मोडा, भीमताल आणि नैनिताल टूर पॅकेज


राजकोट येथून 9 मेपासून हे पॅकेज सुरू होत आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला अल्मोडा, भीमताल, चंपावत, लोहाघाट, चौकोडी, नैनिताल आणि टनकपूरला भेट देण्याची संधी मिळेल.
हे 10 रात्री 11 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 35,340 रुपये आहे.
जर तुम्ही मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला 35,340 रुपये वेगळे द्यावे लागतील.
IRCTC वरून टूर पॅकेज बुक करण्याचा मार्ग खूप सोपा आहे.


 


बद्रीनाथ, गंगोत्री हरिद्वार आणि केदारनाथ टूर पॅकेज


हे पॅकेज 11 मे पासून सुरू होत आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी आणि यमुनोत्रीला एकत्र भेट देण्याची संधी मिळेल.
हे पॅकेज 11 रात्री आणि 12 दिवसांसाठी आहे.
पॅकेज फी - तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 66,800 रुपये आहे.
जर तुम्ही मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला 23,300 रुपये वेगळे द्यावे लागतील.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


 Hidden Gem Travel : कोकण किनारपट्टीतील एक लपलेलं रत्न! 'कर्दे' - एक प्राचीन, शांत समुद्रकिनारा; सर्व काही जाणून घ्या..