Kedarnath : केदारनाथ धामचे दरवाजे कधी उघडणार? भगवान भोलेनाथ आम्हाला कधी दर्शन देणार? भाविक याची आतुरतेने प्रतिक्षा पाहत असतात. पण आता महादेवांच्या भक्तांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने केदारनाथ धामचे दरवाजे उघडणार असल्याची माहिती दिली आहे. केदारनाथला कसे पोहचाल? कसे दर्शन घ्याल? याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या...



कधी उघणार केदारनाथ धामचे दरवाजे?


बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या माहितीनुसार, 2024 मध्ये केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह भगवान भोलेनाथाच्या दर्शनाला जाऊ शकता. यंदा श्री केदारनाथ धामचे दरवाजे 10 मे रोजी सकाळी 7 वाजेपासून उघडतील. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने केदारनाथ धाम सुरू करण्याबाबत आणि नोंदणीबाबत अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला केदारनाथ धाम दर्शनाशी संबंधित माहिती सविस्तरपणे सांगणार आहोत.


बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीची माहिती


समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 मे रोजी पंचमुखी डोली श्री केदारनाथ धामसाठी रवाना होणार आहे. यानंतर विविध थांब्यांवरून ते 9 मे रोजी सायंकाळी केदारनाथ धाम येथे पोहोचेल. बाबांच्या दर्शनासाठी तुम्ही नोव्हेंबरपर्यंत प्रवासाला जाऊ शकता. कारण यानंतर केदारनाथ धाम 6 महिने बंद आहे. गेल्या वर्षी केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिल 2023 रोजी उघडण्यात आले होते आणि ते 15 नोव्हेंबर 2023 रोजी बंद करण्यात आले होते. तुम्ही या वेळेत महादेवाच्या सर्वात खास मंदिरातही दर्शनासाठी जाऊ शकता.



केदारनाथ धाम दर्शनाला कसे जायचे?


रेल्वेने - केदारनाथचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन ऋषिकेश आहे. केदारनाथपासून ऋषिकेश रेल्वे स्टेशन 216 किलोमीटर अंतरावर आहे.


रस्त्याने - उत्तराखंडमधील डेहराडून, ऋषिकेश, हरिद्वार, पौरी, टिहरी, उत्तरकाशी, श्रीनगर आणि चमोली या प्रसिद्ध ठिकाणांहून गौरीकुंडला जाण्यासाठी बस आणि टॅक्सी सहज उपलब्ध आहेत.


गौरीकुंड राष्ट्रीय महामार्ग 109, जो रुद्रप्रयाग ते केदारनाथला जोडतो.


हवाई मार्गे - केदारनाथचे सर्वात जवळचे विमानतळ जॉली ग्रांट आहे जे 238 किलोमीटर अंतरावर आहे.



बद्रीनाथ धामचे दरवाजे कधी उघडतात?


बद्रीनाथ धाम 2024 च्या उद्घाटनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. 12 मे 2024 रोजी सकाळी 6 वाजता ब्रह्म मुहूर्तावर बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातील. हिवाळ्यात मंदिर 6 महिने बंद असते. या महिन्यांत श्री हरी विष्णू विश्रांतीसाठी येथे वास्तव्य करतात असे मानले जाते.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>


Travel : काय सांगता! भारतात एक नाही तर 4 'मिनी स्वित्झर्लंड'; कमी बजेटमध्ये इतकं सुंदर ठिकाण कधीच पाहिलं नसेल