Travel : 'आता नाही तर कधीच नाही, म्हातारपणी होईल पश्चाताप!' सिंगल असाल तर 'ही' ठिकाणं एकदा एक्सप्लोर करा!
Travel : 'आता नाही तर कधीच नाही, म्हातारपणी होईल पश्चाताप!' सिंगल असाल तर 'ही' ठिकाणं एकदा एक्सप्लोर करा!
Ad
एबीपी माझा वेब टीम Updated at:
27 Jun 2024 11:58 AM (IST)
Travel : जर तुम्ही सिंगल असाल आणि कंटाळा आला असेल तर सोलो ट्रिप प्लॅन करा. देशात 'अशी' अनेक ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही आता गेलात नाही, नंतर म्हातारपणात पश्चाताप होईल.
Travel lifestyle marathi news single solo trip explore kerala places
Travel: आपण अनेकदा पाहतो, आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात, ज्यांना कोणत्याच गोष्टीत रस नसतो, त्यांच्या जीवनात ते निराश आणि अस्वस्थ असतात.आपण असेही लोक पाहतो, जे त्यांच्या उतारवयात पश्चाताप करत बसतात की, तरुणपणात हे केलं असतं तर चांगलं झालं असतं, तरुणपणात अशा ठिकाणी गेलो असतो तर.. अशा विविध गोष्टींचा पश्चाताप त्यांना होत असतो, त्यामुळे तुम्ही जर तरुण असाल, विशेष म्हणजे सिंगल असाल तर आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे गेल्यानंतर तुम्ही काहीतरी तुफानी नक्की करू शकता, ज्याचा तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही. जाणून घ्या...
जीवनात एकदा तरी सोलो ट्रिप प्लॅन करा!
अशी काही लोक असतात, ज्यांना सकाळी उठणे, ऑफिसला जाणे, नंतर घरी येणे, रात्रीचे जेवण करून झोपणे एवढेच त्यांना करायचे आहे. संपूर्ण आठवडाभराचे हे त्यांचे वेळापत्रक आहे. ना कुटुंब.. ना मुलं.. ना जोडीदार.. ऑफिसमधून घरी परतल्यावर काही जण एकटेच असतात. पण असंच जर तुम्हीही एकटे राहाल तर तुम्हाला तुमचे आयुष्य कंटाळवाणे वाटेल. कारण कुटुंबासोबत राहणाऱ्या लोकांशी रोज बोलायला कोणीतरी असते. पण एकटे राहणारे लोक सर्वांपासून दूर राहतात. जर तुम्ही एकटे असाल आणि काहीतरी वेगळं करायचं असेल तर सोलो ट्रिप प्लॅन करा. केरळमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही आता भेट दिली नाही तर म्हातारपणात पश्चाताप होईल. कारण वृद्धापकाळात तुम्ही कठीण रस्ते आणि पर्वत चढू शकणार नाही.
कयाकिंगचा आनंद घ्या
केरळमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक असलेल्या अलेप्पी आणि कुमारकोममध्ये तुम्ही कयाकिंगचा आनंद घेऊ शकता. इथे पाण्याखालील छोटी बोट हाताळणे हे अवघड काम आहे. यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल. कारण तुमचे लक्ष थोडेसे विचलित झाले तर तुम्ही पाण्यात पडू शकता. पण केरळमधील सर्वात प्रसिद्ध उपक्रमांपैकी एक आहे. जर तुम्ही केरळला जात असाल तर एकदा हे करून पाहा.
बांबू राफ्टिंग
जर तुम्ही केरळला गेलात आणि बांबू राफ्टिंगचा आनंद घेतला नसेल, तर तुमची सहल अपूर्ण राहील. मित्रांसोबत बांबू राफ्टिंगला जाणे हा एक थरारक अनुभव आहे. पाण्यावर बोट सांभाळणे अवघड काम आहे, पण त्यावर लक्ष केंद्रित केले तर पाण्यात पडणार नाही. थेक्कडी, वायनाड आणि कुट्टानाड सारख्या ठिकाणी तुम्ही बांबू राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.
चेंब्रा पीक ट्रॅक
वायनाडमधील सर्वात सुंदर ट्रॅकपैकी एक, या ठिकाणी ट्रेकिंग करणे इतके सोपे नाही. केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी लोकच त्याच्या शिखरावर पोहोचू शकतात. हे समुद्रसपाटीपासून 2100 मीटर उंचीवर आहे. संपूर्णपणे जंगलांनी वेढलेले हे शहराचे सर्वोच्च शिखर आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही साहस करायचे असेल तर तुम्ही येथे ट्रेकिंगला जाण्याचा बेत करावा.