Travel : ऑगस्ट हा महिना खास आहे. यंदा स्वातंत्र्यदिन ते रक्षाबंधन, म्हणजेच 15 ते 19 ऑगस्ट असा लॉंग वीकेंड आहे. हा वीकेंड फिरायचा प्लॅन तर आहे, पण कुठे जायचे आणि काय करायचे? आणि बजेटचे काय? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील तर चिंता करू नका, भारतीय रेल्वे तुम्हाला एक सुवर्णसंधी देत आहे. IRCTC लाँग वीकेंडसाठी घेऊन येत आहे नैनिताल ट्रीप, ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी असणार आहे. यात खाणं-राहण्याची सोय, सोबत इतरही सुविधा अगदी कमी बजेटमध्ये असणार आहे. जाणून घ्या सविस्तर..
4 दिवसांची मजा... बजेट अगदी कमी दरात!
जर तुम्ही अजून नैनितालचं सौंदर्य पाहीलं नसेल, तसेच इथे जायचं स्वप्न असेल, तर आता तुमचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे, कारण भारतीय रेल्वे म्हणजेच IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये येथे प्रवासाचा आनंद घेऊ शकता. या टूर पॅकेजमध्ये राहण्याची आणि जेवणाची सर्व सोय उपलब्ध आहे. तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून टूर पॅकेज बुक करू शकता. या लॉंग वीकेंडमध्ये कुठे जायचे आणि काय करायचे याचे नियोजन तुम्ही घरी बसून करत असाल तर IRCTC सोबत प्लॅनिंग करू शकता. ज्यामध्ये तुम्ही नैनिताल आणि आसपासच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी गुरुवारी निघू शकता. या 4 दिवसांच्या टूर पॅकेजचे बजेट खिशावर अजिबात जड होणार नाही. कारण तुम्ही या सुंदर ठिकाणाला फक्त 11,675 रुपयांमध्ये भेट देऊ शकताइतर महत्त्वाच्या तपशीलांसह पॅकेजची किंमत जाणून घ्या..
पॅकेजचे नाव- नैनिताल सिटी ऑफ लेक
पॅकेज कालावधी- 4 रात्री आणि 5 दिवस
प्रवास मोड- ट्रेन
कव्हर केलेले डेस्टीनेशन- नैनिताल
तुम्हाला या सुविधा मिळतील
या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला राउंड ट्रिप ट्रेनची तिकिटे मिळतील.
मुक्कामासाठी नॉन-एसी हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल.
या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा उपलब्ध असेल.
जवळच्या ठिकाणी भेट देण्यासाठी कॅब इत्यादी देखील उपलब्ध असतील.
या प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल
जर तुम्ही या ट्रिपमध्ये एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 27,065 रुपये मोजावे लागतील.
दोन लोकांना प्रति व्यक्ती 14,875 रुपये द्यावे लागतील.
तीन लोकांना प्रति व्यक्ती 11,675 रुपये शुल्क भरावे लागेल.
तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल.
बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 7635 रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय तुम्हाला 7015 रुपये द्यावे लागतील.
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला नैनितालचे सुंदर दृश्य पहायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
अशी बुकींग करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : 15 ऑगस्टचा Long Weekend ठरेल अविस्मरणीय! पुण्याजवळ 'या' 3 ठिकाणांना भेट द्या, कमी खर्चात पिकनिक होईल झक्कास...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )