Travel : हिंदू धर्म तसेच पौराणिक मान्यतेनुसार मृत्यूची देवता यमराज आहेत. आणि त्यांचे नाव ऐकताच भल्याभल्याचे हातपाय भीतीने थरथर कापतात. भारतात अशा अनेक अनोख्या तसेच अद्भुत गोष्टी आहेत, ज्या कदाचित काही लोकांना माहीतही नाहीत. यापैकी एक म्हणजे यमराजाचे मंदिर... होय, पृथ्वीवर यमदेवाचे असेच एक गूढ मंदिर आहे. ज्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. जाणून घेऊया याचा रंजक इतिहास आणि माहिती..



अनेक रहस्यांनी भरलेले हे मंदिर..!


लोक यमराजाच्या नावाने घाबरतात, कारण त्यांना मृत्यूची देवता मानली जाते. मात्र तुम्ही कधी यमराजाच्या मंदिराबद्दल ऐकले आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराबाबत सांगणार आहोत. लोक या मंदिरात जायलाही घाबरतात. खरं तर हे अनोखं मंदिर अनेक रहस्यांनी भरलेले आहे. या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की, मृत्यूनंतर आत्मा प्रथम या मंदिरात येतो. इथून त्यांना स्वर्ग मिळेल की नरक हे ठरवले जाते. यासोबत आम्ही तुम्हाला यमराज मंदिर आणि त्याच्या इतिहासाशी संबंधित रंजक गोष्टींबद्दल सांगत आहोत.




भारतात यमराजाचे मंदिर कोठे आहे?


यमराजाचे हे अनोखे मंदिर हिमाचलमधील चंबा जिल्ह्यातील भरमौर येथे आहे. हे जगातील एकमेव यमराजाचे मंदिर आहे. हे मंदिर अगदी लहान आणि अगदी घरासारखे दिसेल. पण, त्याची ख्याती अवघ्या जगभर पसरलेली आहे उंच पर्वतांच्या मधोमध वसलेले हे धर्मराजाचे खास मंदिर कधी आणि कोणी बांधले याची स्पष्ट माहिती कोणालाच नाही. परंतु, सहाव्या शतकात चंबाच्या राजाने मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहास सांगतो. या मंदिरात तांबे, लोखंड, सोने आणि चांदीचे चार दरवाजे आहेत.



यमराज मंदिराशी संबंधित श्रद्धा


या मंदिराशी संबंधित अनेक मान्यता आहेत. असे म्हणतात की, मृत्यूनंतर आत्मा प्रथम या मंदिरात येतो. येथे भगवान चित्रगुप्त एखाद्या व्यक्तीच्या पापांचे आणि पुण्यांचे तपशील पाहतात आणि तो स्वर्गात किंवा नरकात जाण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर यमराज त्या आत्म्याला सोबत घेऊन जातात. त्यामुळे बरेच लोक यापासून खूप दूर पळतात. एवढेच नाही तर मंदिराचे बाहेरून दर्शन घेतल्यानंतर लोक यमाला हात जोडतात.




मंदिराच्या आवारात चित्रगुप्ताची खोली 


आख्यायिका नुसार, या मंदिराच्या आत तुम्हाला एक रिकामी खोली दिसेल, जी चित्रगुप्ताची खोली असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा यमाचे दूत त्याचा आत्मा चित्रगुप्ताकडे आणतात. चित्रगुप्त देव येथे आत्म्याच्या कर्माचा लेखाजोखा लिहितात. यानंतर, त्याला चित्रगुप्ताच्या समोरच्या खोलीत म्हणजेच यमराजाच्या दरबारात नेले जाते. येथे न्याय केला जातो. मग त्या व्यक्तीच्या आत्म्याला स्वर्गात पाठवायचे की नरकात हे ठरवले जाते. 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : हर हर महादेव.. भारतीय रेल्वेकडून ज्योतिर्लिंग दक्षिण यात्रेची सुवर्णसंधी! कमी बजेटमध्ये IRCTC चे खास पॅकेज