Travel : तुम्ही एखाद्या समुद्रात खोलवर गेलात तर नक्कीच तुम्ही त्यात बुडाल. पण पृथ्वीवर असा एक रहस्यमयी समुद्र आहे, ज्यात तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी बुडणारच नाही, अनेकांना हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल. पण हो हे खरंय.. या रहस्यमय समुद्रात कोणीही बुडू शकत नाही, तसेच इथली सुंदर दृश्ये तुम्हाला भुरळ घालतील, कोणते ठिकाण आहे हे? जाणून घ्या..
'या' रहस्यमयी समुद्रावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते..!
इस्रायल आणि जॉर्डनच्या दरम्यान असलेला मृत समुद्र (Dead Sea) हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. जिथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. येथील पाणी इतर समुद्राच्या पाण्यापेक्षा 10 पट जास्त खारट आहे, ज्यामुळे हा समुद्र इतर जलाशयांपेक्षा खूप वेगळा आहे. पृथ्वीवर अनेक आश्चर्यकारक ठिकाणे आहेत आणि असेच एक ठिकाण म्हणजे इस्रायल आणि जॉर्डनच्या दरम्यान असलेला मृत समुद्र. डेड सी त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मृत समुद्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोणीही बुडू शकत नाही. याच्या पाण्यात मिठाचे प्रमाण इतके जास्त आहे की तुम्ही त्यात झोपले तरी बुडणार नाही. एका बाजूला इस्रायलने वेढलेला मृत समुद्र, दुसऱ्या बाजूला जॉर्डनच्या सुंदर टेकड्या आणि वेस्ट बँक हे दृश्य अतिशय सुंदर आहे. मृत समुद्र हा पृथ्वीवरील पाण्याचा सर्वात खालचा भाग आहे. हे समुद्रसपाटीपासून 400 मीटर खाली देखील आहे.
या समुद्राला 'डेड सी' असे नाव का पडले?
इस्त्राईल आणि जॉर्डनच्या दरम्यान असलेल्या समुद्राला 'मृत समुद्र' असे नाव देण्यात आले. कारण त्यात भरपूर मीठ असल्याने कोणताही प्राणी किंवा वनस्पती जिवंत राहू शकत नाही. मृत समुद्रात मीठाची टक्केवारी सुमारे 35% आहे. अशा खारट पाण्यात कोणतीही वनस्पती किंवा कोणताही मासा जगू शकत नाही. त्याचे पाणी सामान्य समुद्राच्या पाण्यापेक्षा 10 पट जास्त खारट आहे.
या समुद्रात लोक का जातात?
मृत समुद्रातील मीठाचे वाळू आणि खडकांवर थर साचले आहे. सोडियम क्लोराईडमुळे ते नेहमी चमकत राहतात. पर्यटक बुडणार नाही म्हणून या समुद्रात पोहायला येतात आणि त्याच्या औषधी गुणधर्माचा लाभ घेतात. या समुद्राच्या चिखलात हायलुरोनिक ऍसिड आणि त्वचेसाठी फायदेशीर अशी अनेक खनिजे आहेत. येथे येणारे लोक अंगावर मातीची पेस्ट लावून सूर्यस्नान करतात.
युद्धामुळे हॉटेल्सच्या दरात घसरण
इस्रायलमधील या समुद्राचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येतात. पर्यटकांच्या राहण्यासाठी मृत समुद्राजवळ अतिशय आलिशान रिसॉर्ट्स बांधण्यात आले आहेत, जे खूप महाग आहेत. मात्र इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे तेथील पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे हॉटेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :