Travel : गोवा (Goa) म्हटलं की सर्व पर्यटकांचे आवडते ठिकाण, या ठिकाणी येण्यासाठी अनेकांचे प्लॅन बनतात. इथले समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य, खाद्यसंस्कृती, साहसी खेळ यासारख्या गोष्टी प्रसिद्ध असल्याने पर्यटकांची नेहमी वर्दळ पाहायला मिळते. तर काही जण शहराच्या गजबजाटापासून दूर निवांतपणा अनुभवण्यासाठी लोक येतात. गोव्यात तसा निसर्गसौंदर्याचा खजिनाच लपलाय म्हणा ना.. पण काही लोकांना इथे लपलेल्या अशा शांत आणि निवांत ठिकाणांबद्दल माहिती नसते. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही, फार कमी लोकांना माहित असलेल्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यावर तुम्ही एक शांत, निवांत आणि सुखाची अनुभूती अनुभवाल... 


 


निसर्गसौंदर्याचा खरा खजिना! गोव्यातील 'या' ठिकाणांबद्दल फार कमी लोकांना माहिती


येत्या महिन्यात तुम्ही गोव्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर येथे काही अशी ठिकाणं आहेत जे पाहण्यास अतिशय सुंदर आहेत. पण या ठिकाणांना खूप कमी लोक भेट देतात. चला तर मग जाणून घेऊया गोव्यातील काही समुद्रकिनाऱ्यांबद्दल ज्यांच्याबद्दल तुम्ही कदाचित ऐकले नसेल, पण त्यांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.




अगोंडा बीच - कॅम्पिंग आणि स्कीइंगसाठी प्रसिद्ध


पणजीपासून 70 किमी अंतरावर असलेला हा समुद्रकिनारा पाहणे खूप मनोरंजक आहे. समुद्राच्या लाटांजवळ शांततेत वेळ घालवण्यासाठी हा बीच योग्य आहे. या बीचबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. येथे तुम्ही सर्फिंग, कॅम्पिंग आणि स्कीइंग सारख्या अॅक्टिव्हीटी देखील करू शकता. अगोंडा बीचवर जाण्यासाठी, तुम्ही बस, कॅब किंवा तुमच्या स्वतःच्या कारने पोहोचू शकता.


 




बटरफ्लाय बीच - अनेक फुलपाखरांच्या प्रजाती दिसतात


बटरफ्लाय बीचवर पोहोचणे फार सोपे नाही पण बटरफ्लाय बीचवर पोहोचल्यावर हे ठिकाण किती सुंदर आहे हे लक्षात येईल. तुम्ही रस्त्याने बटरफ्लाय बीचवर पोहोचू शकत नाही कारण इथपर्यंत पोहोचण्याच्या वाटेवर घनदाट जंगल आहे. जर तुम्हाला या बीचवर जायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला पालोलेम बीचवर जावे लागेल. येथून बोटीने बटरफ्लाय बीचवर जाता येते. जर तुम्हाला साहसाची आवड असेल तर या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. इथे तुम्हाला डॉल्फिन, खेकडे आणि गोल्डफिश अगदी सहज दिसतील. या बीचला सिक्रेट बीच असेही म्हणतात. या बीचचे नाव बटरफ्लाय बीच ठेवण्यात आले कारण येथे अनेक फुलपाखरांच्या प्रजाती दिसतात आणि या बीचचा आकारही फुलपाखरांसारखा दिसतो.




हॉलंट बीच - पर्यटकांची गर्दी फारच कमी


या बीचबद्दलही फार कमी लोकांना माहिती आहे. इथे पर्यटकांची गर्दी फारच कमी आहे, त्यामुळे समुद्राच्या खेळकर लाटा पाहायच्या असतील तर हा बीच अगदी योग्य आहे. पणजीपासून अवघ्या 27 किमी अंतरावर असलेल्या या बीचवर पोहोचणे खूप सोपे आहे. जर तुम्हाला पोहण्याची आवड असेल तर तुम्ही येथे समुद्रात पोहण्याचा आनंद घेऊ शकता. हॉलंट बीचवर कयाकिंगचा आनंद लुटता येतो.


 




बेतुल बीच - निसर्गाचे सुंदर नजारे पाहा..


जर तुम्ही गोव्याला भेट देणार असाल तर केवळ प्रसिद्ध समुद्रकिनारेच नाही तर या अनोळखी समुद्रकिनाऱ्यांनाही नक्की भेट द्या. कारण या ठिकाणांहून निसर्गाचे सुंदर नजारे पाहायला मिळतात. यापैकी एक म्हणजे बेतुल बीच. पणजीपासून बेतुल बीच सुमारे 50 किमी आहे. तुम्ही येथे बसने देखील जाऊ शकता, परंतु तुम्ही खाजगी टॅक्सी किंवा कॅबने गेल्यास अधिक चांगले होईल कारण येथे बस सेवा फारच कमी आहे. जर तुम्हाला सीफूड आवडत असेल तर येथे तुम्हाला स्वादिष्ट सीफूड खायला मिळेल.




बेतालबाटीम बीच


पणजीपासून 38 किमी अंतरावर असलेला हा समुद्रकिनारा सूर्यास्ताच्या वेळी पाहणे मनोरंजक आहे. त्यामुळे या बीचला सनसेट बीच असेही म्हणतात. दक्षिण गोव्याच्या या किनाऱ्यांवर तुम्हाला फार कमी गर्दी दिसेल पण या समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य नक्कीच आकर्षित करेल.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Travel : आता गोवा ट्रीप होईल Success! उन्हाळ्यात गोव्यातील 'ही' 6 लपलेली ठिकाणं फिराल;  तर इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडाल 


 


 



गोव्याला कोणत्या ऋतूत भेट देण्याचा विचार कराल...


तसं गोव्याला तुम्ही कोणत्याही महिन्यात जाऊ शकता पण उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर ही ऑफबीट ठिकाणं चांगली आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो, नोव्हेंबरचे हवामान या ठिकाणासाठी योग्य आहे. 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Travel : आता गोवा ट्रीप होईल Successful..! उन्हाळ्यात गोव्यातील 'ही' 6 लपलेली ठिकाणं फिराल; तर इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडाल