Travel: ज्यांना नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीत देवदर्शन करायचंय? त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेने खास टूर पॅकेज आणलंय. ते अगदी कमी बजेटमध्ये.. भारतीय रेल्वे IRCTC पर्यटकांसाठी देशी आणि विदेशी टूर पॅकेज आणते. या टूर पॅकेजेसच्या माध्यमातून पर्यटक कमीत कमी बजेटमध्ये सोयीस्कर प्रवास करतात, ज्यामुळे पर्यटनालाही चालना मिळते. यंदा IRCTC ने प्रवाशांसाठी मध्य प्रदेश 'महादर्शन टूर' पॅकेज सादर केले आहे. 


 


नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीत करा देवदर्शन...5 दिवसांचे 'टूर पॅकेज' 


भारतीय रेल्वेच्या IRCTC चे हे टूर पॅकेज 5 दिवसांचे असून, 'देखो अपना देश' अंतर्गत सादर करण्यात आले आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये प्रवासी उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर आणि इंदूरला भेट देतील. हे टूर पॅकेज नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. IRCTC टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना निवास आणि भोजन मोफत दिले जाते. अनेक टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही दिली जाते. 


 


4 रात्री आणि 5 दिवसांचे 'टूर पॅकेज' 


IRCTC चे मध्य प्रदेश महा दर्शन टूर पॅकेज 4 रात्री आणि 5 दिवसांचे आहे. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून पर्यटक हे टूर पॅकेज बुक करू शकतात. यासोबतच प्रवासी 8287932229 या क्रमांकावर कॉल करून टूर पॅकेज बुक करू शकतात. या टूर पॅकेजमध्ये पर्यटक फ्लाइट मोडने प्रवास करतील. हे टूर पॅकेज 6 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हे टूर पॅकेज हैदराबादपासून सुरू होणार आहे. 


 





'टूर पॅकेज' चे भाडे किती?


IRCTC च्या या टूर पॅकेजच्या भाडे याबद्दल सांगायचे झाले तर, या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला एकट्याने प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला 35450 रुपये प्रति व्यक्ती भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही दोन लोकांसोबत टूर पॅकेजमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 28950 रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही टूर पॅकेजमध्ये तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला टूर पॅकेजचे भाडे प्रति व्यक्ती 27900 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसोबत टूर पॅकेजमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती भाडे 21450 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही टूर पॅकेजमध्ये 2 ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती भाडे 18950 रुपये द्यावे लागतील.


 


हेही वाचा>>>


Winter Travel : हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत स्वर्गसुख अनुभवायचंय? भारतीय रेल्वेचे नोव्हेंबर-डिसेंबर टूर पॅकेज जारी, कमी बजेटमध्ये अशी करा बुकींग


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )