Travel : स्वातंत्र्यदिननिमित्त (Independence Day 2024) संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे, ऑगस्ट महिन्यात 15 ते 19 दरम्यान लॉंग वीकेंड (Long Weekend) आहे, त्यामुळे अनेकजण कुठेतरी बाहेर फिरण्याचा प्लॅन बनवत आहेत. तसं पाहायला गेलं तर सण-उत्सवात लांब सुट्टीवर जाण्याचा बेत जवळपास प्रत्येकजण आखतो. मात्र या लॉंग वीकेंडच्या काळात रेल्वेचे (Indian Railway) तिकीट मिळणे खूप कठीण आहे. या वीकेंडला फिरायला जायचंय, पण रेल्वेचे तिकीट मिळत नसेल, तर तुम्ही भारतीय रेल्वेच्या पॅकेजने प्रवास करू शकता. कसं ते जाणून घ्या...
फिरायचा आहे प्लॅन, पण तिकीट आहेत वेटींगला
कमी बजेटमध्ये 5 दिवसांच्या सहलीचे नियोजन करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहोत. कारण ट्रेनमधील जागा या 3-4 महिन्यांपूर्वीच अगोदर प्रतीक्षा यादीत जातात. पण आता प्रश्न असा आहे की लोकांनी अचानक कुठे प्रवासाचा बेत आखला? तर रेल्वेचं तिकीट कसं मिळवावं? कारण गाड्यांमध्ये जागांसाठी वेटींग सुरू आहे. अशा लोकांसाठी आमच्याकडे एक चांगला उपाय आहे. भारतीय रेल्वेच्या टूर पॅकेजसह तुम्ही या 5 दिवसांच्या प्रवासाची योजना करू शकता. या पॅकेजेसमध्ये तिकीट बुक केल्याने, तुम्हाला कोणत्याही ट्रेनचे तिकीट बुक करण्याची चिंता करावी लागणार नाही. कारण पॅकेजमध्ये तुमच्या प्रवासाशी संबंधित सर्व सुविधांची भारतीय रेल्वेकडून काळजी घेतली जाईल.
महेश्वर, ओंकारेश्वर आणि उज्जैन टूर पॅकेज
हे पॅकेज 21 ऑगस्टपासून हैदराबादपासून सुरू होत आहे.
हे 4 रात्री आणि 5 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइटने प्रवास करण्याची संधी मिळेल.
पॅकेज फीमध्ये राउंड ट्रिप फ्लाइट तिकीट, जेवणाचा खर्च आणि हॉटेलचा खर्च समाविष्ट असेल.
तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करताना उपलब्ध सुविधा वाचू शकता.
पॅकेज फी- जर दोन लोक एकत्र प्रवास करत असतील तर प्रति व्यक्ती पॅकेज फी 26400 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 25350 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी - 22950 रुपये.
डेहराडून, हरिद्वार, मसुरी आणि ऋषिकेश
हे 5 रात्री आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
हे पॅकेज बरेली, गोरखपूर, हरदोई, लखनौ, कानपूर, मुरादाबाद आणि सिवान जंक्शन येथून सुरू होत आहे.
23 ऑगस्टनंतर तुम्ही दर शुक्रवारी तिकीट बुक करू शकता.
दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 27810 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 21920 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 13795 रुपये आहे.
गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर टूर पॅकेज
हे पॅकेज चंदीगड येथून ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी 31,200 रुपये आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 29,800 रुपये आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 21,350 रुपये आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइट आणि बसने प्रवास करण्याची संधी मिळेल.
अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या https://www.irctctourism.com/ वेबसाईटवरून माहिती घेऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : ट्रॅव्हल प्रेमींसाठी खुशखबर! मुंबई-गुजरातहून भारतीय रेल्वेचे स्वस्त टूर पॅकेज सुरू होतायत, आता कुटुंबासह बिनधास्त फिरा, जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )