Friendship Day 2024 Travel : लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो...! असे अनेक लोक आहेत, जे मैत्रीसाठी काहीही करायला तयार असतात, मित्र जर सुखात असेल तरीही त्याचा आनंद साजरा करतात, मित्र जर दु:खात असेल, तरीही त्याला सोडून जात नाही. अशा एक ना अनेक परिस्थितीत मित्र आयुष्यातील वणव्यामध्ये गारव्यासारखा असतो. यंदा मैत्री दिन 4 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. मग जर फ्रेंडशिप डे ला मित्राला जर सरप्राईझ द्यायचं असेल, तर ते खासच असायला हवं. मैत्रीचे नाते साजरे करण्यासाठी दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या दिवशी लोक मित्रांसोबत वेळ घालवतात. फ्रेंडशिप डे स्पेशल बनवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे गेल्यानंतर तुम्ही रिलॅक्स होऊ शकता..
फ्रेंडशिप डेला तुमच्या मित्रांसोबत एखाद्या उत्तम ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर....
मैत्री हे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील पहिले नाते असते, जे व्यक्ती स्वतः तयार करतो. माणूस त्याच्या विचार आणि आवडी-निवडीनुसार मैत्री करतो. शाळा, कॉलेज, ऑफिस, सोशल मीडिया यासह अनेक ठिकाणे आहेत जिथे लोक मैत्री करतात. मैत्रीचे हे खास नाते साजरे करण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या खास दिवशी लोक अनेकदा पार्टी करतात, बाहेर जातात आणि मित्रांसोबत वेळ घालवतात. जर तुम्हीही या फ्रेंडशिप डेला तुमच्या मित्रांसोबत एखाद्या उत्तम ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे तुमच्यासाठी खास असतील
जयपूर - मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण
राजस्थानमधील सुंदर जयपूर शहर हे भेट देण्यासाठी आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात अनेक प्राचीन आलिशान राजवाडे आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. जे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एक्सप्लोर करू शकता. येथे तुम्ही मित्रांसोबत राजस्थानी खाद्यपदार्थ देखील चाखू शकता.
मसुरी - सुंदर दृश्य तुमचा फ्रेंडशिप डे संस्मरणीय बनवेल
भारताच्या उत्तराखंड राज्यात अनेक हिल स्टेशन्स आहेत, ज्यांना फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने भेट देणे खास आहे. मसुरी हे या हिल स्टेशनपैकी एक आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुम्ही दोन ते तीन दिवस मसुरीला जाण्याचा बेत आखू शकता. या काळात तुम्हाला मित्रांसोबत सुंदर टेकड्यांचे आकर्षक दृश्य पाहण्याची संधी मिळेल. याशिवाय तुम्ही मसुरीच्या प्राचीन मंदिरांनाही भेट देऊ शकता. मसुरीचे सुंदर दृश्य तुमचा फ्रेंडशिप डे संस्मरणीय बनवेल.
लॅन्सडाउन - कमी गर्दीचे हिल स्टेशन
या फ्रेंडशिप डेमध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल, तर लॅन्सडाउन तुमच्यासाठी खूप छान असेल. हे कमी गर्दीचे हिल स्टेशन आहे, जिथे तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. येथे तुम्ही मित्रांसोबत निवांत क्षण घालवू शकता. लॅन्सडाउन हे मित्रांसोबत आनंदी क्षण घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही कमी बजेटमध्ये फ्रेंडशिप डे मोठ्या पद्धतीने साजरा करू शकता.
ऋषिकेश - कॅम्पिंग, राफ्टिंग, मित्रांसोबत ट्रेकिंगची संधी
मित्रांसोबतचा हा फ्रेंडशिप डे संस्मरणीय बनवण्यासाठी ऋषिकेश हे योग्य ठिकाण आहे. ऋषिकेशमध्ये तुम्हाला कॅम्पिंग, राफ्टिंग, मित्रांसोबत ट्रेकिंगसह अनेक साहसी क्रिया करण्याची संधी मिळेल. कॅम्प हाऊसपासून लक्ष्मण झुला आणि त्रिवेणी घाटापर्यंत अनेक खास ठिकाणे येथे पाहण्यासाठी आहेत. हा फ्रेंडशिप डे स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही ऋषिकेशच्या सहलीची योजना आखू शकता.
हेही वाचा>>>
Women Travel : 'स्वतःसाठी सबुरी घे..तुझ्या रंगी रंगुनी घे!' निसर्गप्रेमी महिलांनो सोलो ट्रिपला निघताय? 'ही' Wildlife Destinations ठरतील योग्य
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )