Travel : जर तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त झाले तर कोणत्याही स्त्रीला आनंद होईल. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल या जगात देवी सीतेचे असे एक दुर्मिळ मंदिर आहे. जिथे गेल्यानंतर स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि तिच्या वैवाहिक जीवनात कोणतीही समस्या आली तर देवी त्याची काळजी घेते अशी भाविकांची मान्यता आहे. येथे तुम्हाला अखंड सौभाग्य देणारे सिंदूर मिळेल. कोणते आहे हे मंदिर? जाणून घेऊया सविस्तर...


 


देवी सीतेची मंदिरं भारतातच नाही, तर परदेशातही आहेत. 


केवळ भारतातच नाही तर परदेशात एक मंदिर आहे, ज्याबद्दल अशी मान्यता आहे की, जी स्त्री या मंदिरातील सिंदूर लावते, तिचे देवी सीता रक्षण करते. सीता नवमी गुरुवार, 16 मे रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला देवी सीतेचा जन्म झाला. देवी सीतेची जयंती जानकी नवमी म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी लोक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी विविध ठिकाणी मंदिरात जातात. भारतामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत, ज्यांचे माता सीता आणि श्रीराम यांच्याशी घट्ट नाते आहे. मात्र देवी सीतेची मंदिरं भारतातच नाही, तर परदेशातही आहेत. परदेशातही एक ठिकाण आहे, जिथे देवी सीतेचे सर्वात मोठे मंदिर आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला देवी सीतेच्या काही प्रसिद्ध मंदिरांची सविस्तर माहिती देणार आहोत.




नेपाळ - विवाहित महिलांसाठी प्रसिद्ध मंदिर...


नेपाळमध्ये माता सीतेचे प्रसिद्ध मंदिर काठमांडूपासून 400 किलोमीटर अंतरावर आहे. 4860 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेले असल्याने हे मंदिर सीतेच्या सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर विवाहित महिलांसाठी प्रसिद्ध मानले जाते. कारण असे मानले जाते की येथेच श्री राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. येथे दर्शन घेण्यासाठी दररोज दूरदूरवरून लोक येतात.



अशोक वाटिका, श्रीलंका


श्रीलंकेतील याच ठिकाणी रावणाने देवी सीतेचे अपहरण करून तिला काही दिवस ठेवले होते. सीता माता ज्या अशोकाच्या झाडाखाली बसायची ती जागा आजही सीता इल्या नावाने प्रसिद्ध आहे. याशिवाय श्रीलंकेत एक महाल आहे जो रामायण काळातील असल्याचे मानले जाते. इथली माती अजूनही काळी आहे, असं मानलं जातं. कारण हनुमानाने लंका जाळल्यानंतर येथील माती काळी झाली होती. श्रीलंकेच्या इतर भागांमध्ये माती लाल आहे, परंतु केवळ याच भागात माती काळी दिसते हे माता सीतेचे एक प्रसिद्ध मंदिर आहे.



श्रीलंकेत देवी सीतेचे भव्य मंदिर


श्रीलंकेत देवी सीतेचे भव्य मंदिर बांधले जात आहे. 19 मे रोजी मंदिरात अभिषेक होईल. त्यासाठी अयोध्येतील पवित्र शरयू नदीचे पाणी श्रीलंकेला पाठवले जाणार आहे. यावरून तुम्ही समजू शकता की केवळ देशातच नाही तर परदेशातही देवी सीतेच्या भक्तांसाठी पूजेच्या सोयीसाठी विशेष पावले उचलली जात आहेत.


 






 


हेही वाचा>>>


Travel : एका अथांग समुद्राचे अद्भुत सौंदर्य.. निसर्गाची साद अन् जोडीदाराची साथ.. महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणतात 'या' ठिकाणाला


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )