Travel : काश्मीर.. भारतातील असं ठिकाण, ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात.. जिथे जायचं अनेकांचं स्वप्न असतं, पण ते म्हणतात ना. नशीबात असेल तर नक्की मिळेल, तर आता नशीब आणि संधी दोन्हीही मिळतंय. कारण तुमचं काश्मीरला अगदी कमी बजेटमध्ये जायचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण भारतीय रेल्वेने म्हणजेच IRCTC ने नुकतेच एक टूर पॅकेज लॉन्च केले आहे, ज्यामध्ये तुम्ही सप्टेंबर महिन्यात येथे भेट देण्याचा प्लॅन करू शकता. किती खर्च येईल? काय सुविधा असतील? जाणून घ्या..
काश्मीर सहलीला अगदी कमी खर्चात जाऊ शकता..
काश्मीर हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हिरवेगार डोंगर, गवताळ प्रदेश आणि स्वर्गाप्रमाणे भासणाऱ्या दऱ्या या काश्मीरच्या सौंदर्यात भर घालतात. काश्मीरला भेट देण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो, परंतु पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही या ठिकाणाचे दृश्य वेगळे असते. ज्यामध्ये तुम्ही खूप मजा करू शकता. जर तुम्हाला अजूनही काश्मीर मधील निसर्गसौंदर्याला भेट देण्याची संधी मिळाली नसेल, तर सप्टेंबरमध्ये तिथे जाण्याचा प्लॅन करा. भारतीय रेल्वेच्या IRCTC ने आपल्या सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. या सहलीला फारच कमी खर्च येणार आहे. तसेच या पॅकेजमध्ये फ्लाइटपासून निवासापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध असतील. तुम्ही ते IRCTC च्या अधिकृत साइटवरून बुक करू शकता.
IRCTC काश्मीर टूर पॅकेज
पॅकेजचे नाव- Fascinating Kashmir
पॅकेज कालावधी- 5 रात्री आणि 6 दिवस
प्रवास- फ्लाइट (विमान प्रवास)
कव्हर केलेले डेस्टीनेशन- गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर, सोनमर्ग
तुम्ही कधी प्रवास करू शकाल - सप्टेंबर
तुम्हाला या सुविधा मिळतील
तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लासची तिकिटं मिळतील.
राहण्यासाठी हॉटेल सुविधा उपलब्ध असतील.
या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवणही उपलब्ध असेल.
या प्रवासासाठी इतके शुल्क आकारले जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास केल्यास तुम्हाला 48,460 रुपये मोजावे लागतील.
तर दोन लोकांना प्रति व्यक्ती 43,655 रुपये मोजावे लागतील.
तीन लोकांना प्रति व्यक्ती 42,270 रुपये शुल्क भरावे लागेल.
मुलांसाठी वेगळे शुल्क भरावे लागेल.
बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 33,670 रुपये द्यावे लागतील
तर बेडशिवाय तुम्हाला 30,925 रुपये द्यावे लागतील.
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जर तुम्हाला काश्मीरचे सुंदर नजारे पाहायचे असतील, तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
अशी बुकिंग करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Monsoon Travel : पावसाळ्यात काश्मीरचे सौंदर्य वेड लावेल तुम्हाला! नजर हटणार नाही, भारतीय रेल्वेकडून ऑगस्टमध्ये फिरण्याची भारी संधी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )