Travel : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हवामान असते. त्यामुळे सध्या कुठे ऊन, कुठे पाऊस, तर कुठे थंडी पाहायला मिळत आहे. जर तुम्हालाही या उन्हाळ्यापासून दिलासा हवा असेल, किंवा सुखद गारवा अनुभवायचा असेल? मे-जूनच्या कडाक्याच्या उन्हात थंडी अनुभवायची असेल? तर तुम्ही देशातील सर्वात थंड ठिकाणी जाऊ शकता. या लेखात आम्ही देशातील सर्वात थंड शहराबद्दल बोलत आहोत, जिथे तुम्ही उन्हाळ्यातही अंगाचा थरकाप भरविणाऱ्या थंडीचा आनंद घेऊ शकता. जाणून घ्या असे कोणते ठिकाण आहे.
भारतातील सर्वात थंड शहराबद्दल जाणून घ्या..
उन्हाळा म्हटला की सर्वच ठिकाणी तापमान वाढू लागते. कडक उन्हामुळे आणि उष्णतेमुळे घाम येतो. अशा वातावरणात ना कोणाला बाहेर पडावंसं वाटतं, ना सतत घरात राहावंसं वाटतं. तर उन्हाळ्यात काही लोकांना थंड ठिकाणी आरामशीर सुट्टीचा आनंद घ्यायचा असतो. भारतात जरी अनेक हिल स्टेशन्स असली तरी तिथे उन्हाळ्यात इतर ठिकाणांपेक्षा तापमान कमी असते, परंतु सूर्यप्रकाश आणि उष्णता देखील जाणवते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात थंड शहराबद्दल सांगत आहोत. जाणून घ्या..
हिमालय पर्वत रांगांच्या मधोमध वसलेले हे ठिकाण..
ते ठिकाण आहे लेह लडाख.. इथे वर्षभर थंडी असते. लडाख हे हिमालय पर्वतरांगांच्या मधोमध वसलेले आहे, जिथे हिवाळ्यात इतकी थंडी असते की तापमान उणेच्या पलीकडे जाते. तर उन्हाळ्यात या ठिकाणी भेट देत असाल तर, या काळात येथील तापमान 2 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत असते. या वेळी, बर्फाचे पर्वत पाहता येतात. मे आणि जूनच्या कडक उन्हात थंडगार थंडीचा अनुभव घेता येतो.
द्रास आणि सियाचीन ग्लेशियर
एप्रिल महिन्यात राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असताना द्रासमध्ये ते 7 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. द्रास हे लेह लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील एक शहर आहे, जे भारतातील सर्वात थंड शहर मानले जाते. सियाचीन ग्लेशियर देखील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. येथे तापमान उणे -50 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते. सियाचीन ग्लेशियर हे हिमालयाच्या पूर्व काराकोरम रेंजमध्ये भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ बर्फाच्छादित भाग आहे.
तवांग
अरुणाचल प्रदेशातील तवांग शहराचाही सर्वात थंड ठिकाणांमध्ये समावेश होतो. या ठिकाणी हिवाळ्याच्या मोसमात प्रचंड हिमवृष्टी आणि हिमस्खलन होते. त्याचबरोबर उन्हाळ्यात येथील तापमान कमी असते. तवांगचे नैसर्गिक सौंदर्य आणि थंडपणा पर्यटकांना उन्हाळ्यात येथे भेट देण्यास प्रोत्साहित करते.
हेही वाचा>>>
Travel : शिमला, मनाली विसराल! जेव्हा निसर्गाच्या कुशीतलं 'हे' सुंदर गाव पाहाल, जिथे तुम्हाला कोणीही Disturb करणार नाही, कमी बजेटमध्ये फिराल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )