Travel : तिरुपती..रामेश्वरम.. मदुराई.. कन्याकुमारी.. आणि इतरही देवस्थानांना एकाच वेळी भेट देण्याची संधी मिळाली तर.. हो हे खरंय, कारण भारतीय रेल्वे (Indian Railway) तुम्हाला पुण्य कमावण्याची संधी देत आहे. भारतीय रेल्वेकडून धार्मिक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी दक्षिण भारत यात्रा (South India Yatra) विशेष टूर पॅकेजचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून दक्षिण भारत फिरायला तर मिळेलच सोबत महत्त्वाच्या देवस्थानांच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकाल. जाणून घ्या या विशेष पॅकेजबद्दल...
आयआरसीटीसीकडून भारत गौरव टुरिस्ट ट्रेन
भारतीय रेल्वेकडून एकीकडे, IRCTC देशातील आणि परदेशातील विविध ठिकाणांना भेट देण्यासाठी टूर पॅकेजेस लाँच करण्यात येते, तर दुसरीकडे धार्मिक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी टूर पॅकेजचे आयोजन करण्यात येते. या पॅकेज मार्फत दक्षिण भारत फिरण्यासाठी आयआरसीटीसीकडून भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सुरू होणार आहे.
रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, तिरुपती...
हे पॅकेज 11 रात्री 12 दिवसांसाठी असेल. या पॅकेजद्वारे पर्यटकांना रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम (कोचुवेली), मल्लिकार्जुन आणि तिरुपती येथे जाण्याची संधी मिळणार आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर, रामनाथस्वामी मंदिर, मीनाक्षी मंदिर आणि पद्मनाभस्वामी मंदिराचे दर्शन दिले जाईल. या टूर पॅकेजमध्ये एकूण बर्थ 780 आहेत. यामध्ये आराम श्रेणीतील 380 जागा आणि मानक श्रेणीतील 400 जागा आहेत. IRCTC वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी बुकिंग करू शकतात. हा आध्यात्मिक ट्रेनचा प्रवास 3 मे रोजी जयपूरहून सुरू होईल आणि 14 मे रोजी जयपूरला परतेल.
या मंदिरांना तसेच या ठिकाणी दर्शन दिले जाणार
त्रिवेंद्रम (कोचुवेली): पद्मनाभस्वामी मंदिर, कोवलम बीच
मरकापूर : मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर
तिरुपती: भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिर
रामेश्वरम: श्री रामनाथ स्वामी मंदिर
कन्याकुमारी: स्थानिक प्रेक्षणीय स्थळे
मदुराई: मीनाक्षी मंदिर
टूर पॅकेजची खास वैशिष्ट्ये
पॅकेजचे नाव- दक्षिण भारत यात्रा (NZBG31)
कव्हर केलेली स्थानक- रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम (कोचुवेली), मल्लिकार्जुन आणि तिरुपती
बोर्डिंग/डी-बोर्डिंग स्टेशन- जयपूर, अजमेर, चित्तौडगड आणि उदयपूर शहर
प्रवास सुरू होण्याची तारीख- 3 मे , 2024
टूर कालावधी- 11 रात्री/12 दिवस
प्रवास - ट्रेन
टूर पॅकेज भाडे किती आहे?
टूर पॅकेजचे दर प्रवाशाने निवडलेल्या श्रेणीनुसार असतील.
या पॅकेजचे भाडे 30,550 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होते.
जर तुम्ही स्टँडर्ड कॅटेगरी अंतर्गत बुक केले तर तुम्हाला प्रति व्यक्ती 30,550 रुपये खर्च करावे लागतील.
तर, आराम श्रेणी अंतर्गत बुकिंगसाठी, तुम्हाला प्रति व्यक्ती 35,860 रुपये खर्च करावे लागतील.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : आता गोवा ट्रीप होईल Success! उन्हाळ्यात गोव्यातील 'ही' 6 लपलेली ठिकाणं फिराल; तर इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडाल