Health Tips : आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल बघायला मिळतो, त्यामुळे व्यक्ती फोनची स्क्रीन पुन्हा पुन्हा पाहत राहतो. याशिवाय, वर्क फ्रॉम होममुळे व्यक्ती लॅपटॉपवर काम करण्यात आपला वेळ घालवते. ऑफिसचे काम केल्यानंतर एखादी व्यक्ती मनोरंजनासाठी टीव्ही पाहते. यामुळे, व्यक्तीचा जवळजवळ संपूर्ण वेळ गॅजेट्सच्या स्क्रीनसमोर जातो, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवण्याचा धोका असतो.
खराब जीवनशैली आणि व्यस्त वेळापत्रकामुळे लोकांचे घराबाहेर पडणे देखील कमी झाले आहे. अशात लोकांना एकमेकांना भेटायला वेळ मिळत नाही. याशिवाय बाहेरील वातावरणामुळे त्यांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत ते घरीच बसून मोबाईलवर आपला वेळ घालवतात.
मोबाईलच्या स्क्रीनसमोर जास्तीत जास्त वेळ घालवल्याने डोळ्यांच्या समस्या, डोकेदुखी, निद्रानाश, नैराश्य आणि चिंता या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही निरोगी राहू शकाल. यासोबतच दिवसातील स्क्रीन टाईमही कमी केला पाहिजे.
स्क्रीनटाईम कसा कमी कराल?
* मोबाईल, लॅपटॉप सारखे गॅझेट जपून वापरा.
* गॅझेट वापरण्यासाठी एक वेळ शेड्यूल करा.
* ब्रेक दरम्यान स्क्रीनकडे पाहू नका.
* स्क्रीनशिवाय काम करण्याचा प्रयत्न करा.
* गरज नसताना केवळ फोनच्या फक्त महत्त्वाच्या सूचना चालू ठेवा.
* घराबाहेर फिरायला जा.
* घरात एक ‘मोबाईल फ्री’ क्षेत्र बनवा.
* एका वेळी फक्त एक स्क्रीन पहा.
* सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करा.
* मैदानी खेळ खेळा.
* कुटुंब आणि मित्रांसह जास्तीत जास्त बोला.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Pineapple Benefits: अननस खा अन् वजन कमी करा! जाणून घ्या याचे फायदे...
- Lassa fever : ओमायक्रॉननंतर धुमाकूळ घालतोय 'लासा फिवर'; काय आहेत लक्षणं?
- Weight Loss : वजन कमी करण्यासाठी अनोशेपोटी घ्या 'हे' ड्रिंक्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha