Tick Tock Day 2022 : आज 29 डिसेंबर म्हणजेच 'टिक टॉक' दिन. हा दिवस सरत्या वर्षाची आठवण करून देणारा असा दिवस आहे. त्यामुळे तुमच्या टू डू लिस्टमध्ये काही कामे करायची बाकी असतील तर ती आत्ताच करून घ्या. टिक टॉक डे हा त्याचीच आठवण करून देणारा दिवस आहे. मात्र, टिक टॉक दिन कधीपासून सुरु झाला. याची पार्श्वभूमी काय असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आम्ही तुम्हाला याच संदर्भात माहिती सांगणार आहोत.  


टिक टॉक दिनाचा इतिहास : 


प्रत्येक सणाच्या उत्सवामागे एक उद्देश असतो. टिक टॉक दिनाच्या दोन कथा आहेत. एका कथेत असा दावा केला जातो की, दोन मित्र जे मद्यपान न करता नवीन वर्षाच्या उत्सवासाठी बाहेर जाण्याचा आणि पार्टी करण्यासाठी पर्याय शोधत होते त्यांनी या सुट्टीचा शोध लावला. वर्षाचे शेवटचे काही तास घड्याळात नवीन वर्षाची मोजणी पाहण्यात घालवण्यासाठी, त्यांनी रात्री 12 नंतरचा अलार्म सेट करण्याचा निर्णय घेतला.


अमेरिकन व्हॉईस अभिनेता थॉमस रॉय आणि त्याची पत्नी रुथ रॉय यांना दुसर्‍या कथेचे श्रेय दिले जाते. कारण वर्ष पूर्ण होण्याआधी लोकांनी आपल्या अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पांवर काम करावे याची सुरुवात त्यांनी केली होती.  


टिक टॉक दिनाचे महत्त्व : 


टिक टॉक डे वेळेचे महत्त्व सांगण्यासाठी साजरा केला जातो. दरवर्षी 29 डिसेंबर रोजी, जगभरातील लोक एकत्र येतात आणि प्रत्येक क्षण किती मौल्यवान आहे आणि ते त्याचा पुरेपूर उपयोग कसा करू शकतात हे सांगण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे कालांतराने आनंद करण्याचा आणि आपल्या जीवनातील सर्व अद्भुत गोष्टींसाठी आभार मानण्याची संधी निर्माण करणारा आहे. 


टिक टॉक डे सेलिब्रेशन


तुम्हाला सुद्धा यावर्षीचा टिक टॉक दिन साजरा करायचा आहे. तर तुम्ही काही छोट्या गोष्टींनी त्याची सुरुवात करू शकतात. सुरू करण्यासाठी, तुमची घड्याळं एका मिनिटाने पुढे ठेवा. घड्याळातील बदलत्या वेळेकडे लक्षपूर्वक पाहा. आणि त्या क्षणाचा आनंद घ्या. काही काळ आपल्या सभोवतालच्या टिक टॉकच्या आवाजांचा आनंद घ्या. टिक टॉक डे हा खऱ्या अर्थाने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे.  


महत्त्वाच्या बातम्या : 


Coronavirus And New Year : कोरोनाचं सावट, नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर फिरायला जात असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा!