Yoga For Pollution : दिल्ली-एनसीआरमध्ये वाढते वायू प्रदूषण (Air Pollution) ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. विशेषत: दिवाळीच्या आसपास येथील हवा अधिक प्रदूषित होते. प्रदूषित हवेत श्वास घेणे कठीण होऊन लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. घसा खवखवणे, खोकला, डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही सामान्य लक्षणं झाली आहेत. प्रदूषण टाळण्यासाठी, अनेक लोक आपल्या घरात एअर प्युरिफायरचा वापर करतायत. अशा वेळी वायुप्रदूषण रोखण्यासाठी योग आणि प्राणायाम हा एक चांगला पर्याय आहे. योगामुळे शरीरातील नसा उत्तेजित होतात. योगासने आणि प्राणायाम केल्याने फुफ्फुसाची क्षमता वाढते, ज्यामुळे प्रदूषणाचा प्रतिकारही वाढतो. वायू प्रदूषण टाळण्यासाठी कोणते योग आणि प्राणायाम करावेत ते जाणून घ्या.


कपालभाती प्राणायाम


वायुप्रदूषणापासून संरक्षणासाठी कपालभाती प्राणायाम खूप फायदेशीर आहे. या प्राणायाममध्ये दीर्घ श्वास घेतल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि शरीराला ऑक्सिजन चांगल्या प्रकारे घेण्यास मदत होते. हे फुफ्फुस मजबूत करते आणि फुफ्फुसाचे कार्य सुधारते. हा प्राणायाम नियमित केल्याने वायुप्रदूषणाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढते आणि श्वसनाच्या समस्या कमी होतात. 


भस्त्रिका प्राणायाम


भस्त्रिका प्राणायाम फुफ्फुसातील रक्त परिसंचरण वाढवते ज्यामुळे फुफ्फुस मजबूत होतात. हा प्राणायाम रोज केल्याने आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि वायू प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांशी लढण्याची क्षमता वाढते. त्यामुळे श्वासोच्छवासाचा वेग वाढतो. ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. 


भुजंगासन


या आसनात जमिनीवर झोपावे लागते म्हणून त्याला भुजंगासन म्हणतात. भुजंगासन केल्याने फुफ्फुसाची क्षमता वाढते आणि खोल श्वास घेण्यास मदत होते. या आसनामुळे फुफ्फुसांवर दबाव टाकून ते मजबूत होतात. कोणतेही योगासन किंवा प्राणायाम योग्य प्रकारे करणे फार महत्वाचे आहे. जर आपण ते चुकीच्या पद्धतीने केले तर आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळू शकत नाहीत. 


जर तुम्ही नियमित हे तीन आसनं केलीत तर तुमचे शरीर तर निरोगी राहीलच पण त्याचबरोबर वाढत्या वायू प्रदूषणापासून तुमची सुटका देखील होईल. तसेच तुम्ही नेहमी तंदुरूस्त आणि प्रसन्नदेखील राहाल. यासाठी योग फार महत्त्वाचा आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Kitchen Tips : तुम्ही जे पनीर खाता ते चांगलं की बनावट? बाजारातून आणताच 'असं' तपासा